शिवसेनेने हिंदुत्व सोडलं नाही असं सांगण्याची बाळासाहेबांवर वेळ आली नाही, दानवेंचे टीकास्त्र

Raosaheb Danve criticizes Shiv Sena over Sambhaji Raje's candidature
Raosaheb Danve criticizes Shiv Sena over Sambhaji Raje's candidature

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्य उपस्थितीत काल मुंबईतील बीकेसी मैदानात शिवसेनेची जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विरोधकांची चांगलीच शाळा घेतली. या सभेनंतर विरोधकांनाही टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. दरम्यान भाजप नेते रावसाहेब दानवे यांनाही आज मुख्यमंत्र्यांच्या सभेतील भाषणावर टीकास्त्र डागले आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुळ मुद्दा होता आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. पण मी सांगू इच्छितो की, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं की नाही, याचं प्रमाणपत्र आता देण्याची गरज नाही. पण जेव्हा ते सांगतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही भाजपला सोडलं यावरूनचं सिद्ध होत की, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंच्या काळात आम्ही हिंदु आहोत, हिंदुत्व सोडलेलं नाही असं सांगण्याची पाळी आली नाही. ज्या पक्षाने शिवसेना, भाजपला शिव्या घातल्या, जे स्वत:ला सेक्युलर समजत होते अशांच्या पंक्तीत जाऊ बसले याचा अर्थ त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या गप्पा मारणं आता सभा घेऊन म्हणा किंवा खाजगीत म्हणा बंद केल्या पाहिजे.” असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

“मुख्यमंत्र्यांच्या या सभेकडून राज्यातील जनतेलाही खूप उत्सुकता होती की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्याला उद्देशून काही तरी बोलणार आहेत म्हणून सर्वजण टीव्हीकडे डोळे लावून बसले होते. पण मुख्यमंत्र्यांच भाषण ऐकल्यानंतर सर्वांची निराशा झाली.” अशी टीका दानवेंनी केली आहे,.

मुख्यमंत्र्याच्या तोंडून आम्ही काय करतोय, आम्ही काय करणार आहेत आणि राज्याची सध्याची स्थिती काय आहे, आम्ही या राज्यातील जनतेला दिलासा देऊ शकतो अशाप्रकारचे वक्तव्य झालं पाहिजे होते. मात्र विकासाची चर्चा न करता, राज्यातील जनतेला कुठल्याही प्रकारचा दिलासा न देता त्यांनी केवळं आणि केवळ भाजपंवर तोंड सुख घेण्याचं काम केल आहे. असाही रावसाहेब दानवे म्हणाले.