मुंबई : गणेशोत्सवाच्या दरम्यान मुंबईत रेल्वेने प्रवास करणाऱ्या भाविकांना रेल्वेच्या (Railway) मेगाब्लॉकमुळे (Megablock) प्रवासात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून तो गणेश विसर्जनापर्यंत रद्द करण्याच्या संदर्भात मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर नरेश ललवानी जी यांच्याशी बोलणे झाले. गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही केलेली विनंती त्यांनी मान्य केली असून, गणेशोत्सवादरम्यान मुंबई रेल्वेत कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे, असं ट्वीट भाजपा (BJP) नेते आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी केले होते. मात्र आता मध्य रेल्वेने उपनगरी विभागांवर मेगाब्लॉक कार्यान्वित असेल म्हटले आहे. रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात पत्रक जारी केले आहे. (BJP says no megablock Leaflet of Megablock on Thane Kalyan route from Railway Administration)
हेही वाचा – समान शत्रूला पराभूत करण्यासाठी…; सुजात आंबेडकरांच्या नाराजीनंतर रोहित पवाराचं ट्वीट
मंगल प्रभात लोढा यांनी ट्वीट करताना म्हटले होते की, मुंबईतील गणेश भक्तांसाठी खुशखबर! गणेशोत्सवाच्या दरम्यान मुंबईत रेल्वेने प्रवास करणाऱ्या भाविकांना रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे प्रवासात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून तो गणेश विसर्जनापर्यंत रद्द करण्याच्या संदर्भात मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर नरेश ललवानी जी यांच्याशी बोलणे झाले. गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही केलेली विनंती त्यांनी मान्य केली असून, गणेशोत्सवादरम्यान मुंबई रेल्वेत कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे, असा दावा त्यांनी केला होता. मात्र आता रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉकसंदर्भात पत्रक जारी केले आहे.
मुंबईतील गणेश भक्तांसाठी खुशखबर!
गणेशोत्सवाच्या दरम्यान मुंबईत रेल्वेने प्रवास करणाऱ्या भाविकांना रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे प्रवासात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून तो गणेश विसर्जनापर्यंत रद्द करण्याच्या संदर्भात मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री नरेश ललवानी जी यांच्याशी बोलणे…
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) September 16, 2023
रेल्वे प्रशासनाने म्हटले की, मध्य रेल्वेवर उद्या (17 सप्टेंबर) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरी विभागांवर मेगा ब्लॉक कार्यान्वित करेल. ठाणे-कल्याण मेन लाईन अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत आणि मुलुंडहून सकाळी 10 वाजून 43 मिनिटांनी ते दुपारी 3 वाजून 44 मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या/अर्ध जलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबतील व गंतव्य स्थानकावर नियोजित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने पोहोचतील.
हेही वाचा – गणेशोत्सव काळात 24 तास रेल्वे सुरू ठेवा, जितेंद्र आव्हाड यांची सरकारकडे मागणी
कल्याणहून सकाळी 10.36 ते दुपारी 3.51 पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या/अर्ध जलद सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील व गंतव्य स्थानकावर नियोजित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन धीम्या सेवा नियोजित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने आगमन होईल/सुटतील. याशिवाय रेल्वे प्रशासनाने ट्रान्स हार्बर लाईन आणि हार्बर लाईनवर मेगाब्लॉक नसणार असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे मंगल प्रभात लोढा यांनी गणेशोत्सव काळात मेगाब्लॉक नसणार म्हटल्याचा दावा फोल ठरल्याचे दिसत आहे.