घरमुंबईयुतीची घोषणा कोणत्याही क्षणी!

युतीची घोषणा कोणत्याही क्षणी!

Subscribe

भाजपची वाढती महत्त्वाकांक्षा पाहता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेना युतीचे काही खरे नाही, अशा चर्चांना एका बाजूला उधाण आलेले असताना दुसर्‍या बाजूला मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे सूतोवाच केले. एका दिवसात अचानक कधीही आम्ही युतीची घोषणा करू, असे जाहीर करून त्यांनी युतीविषयी चाललेल्या तर्कवितर्कांना थोपविण्याचा प्रयत्न केला.

निमित्त होते भाजपच्या महाजनादेश यात्रेदरम्यानच्या बीडमधील पत्रकार परिषदेचे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी भाजप-शिवसेना युती झाली हे माध्यमांना कळले नाही. युती होईल की नाही याची चर्चा होत असताना ही घोषणा आम्ही केली. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा कधी होईल ते कळणारही नाही, असे फडणवीस म्हणाले. बीड जिल्ह्यात भाजपच्या महाजनादेश यात्रेचे जनतेने प्रचंड स्वागत केले, पण याविरोधात आपण विरोधकांच्या यात्रेची परिस्थिती निश्चितपणे बघू शकता. लोकांचा प्रतिसाद राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या यात्रेला मिळत नाही. काँग्रेसला यात्रादेखील मंगल कार्यालयात सुरू करावी लागते. राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा, तर सुप्रिया सुळे यांनी दुसरी संवाद यात्रा काढली. सत्तेत असताना जनतेशी संवाद ठेवला नाही अन्यथा त्यांच्यावर ही परिस्थिती आली नसती. सत्तेत असताना त्यांनी केवळ स्वतःशी संवाद केला, जनतेशी नाही. त्यामुळे जनतेने त्यांना या परिस्थितीमध्ये आणले आहे, असा टोला मुख्यमंत्र्यानी लगावला.

- Advertisement -

कोकणातील वाया जाणारे १६७ टीएमसी पाणी मराठवाड्यात आणले जाणार असून हा महत्त्वाकांक्षी निर्णय आमच्या सरकारने घेतल्याची आठवण यावेळी फडणवीस यांनी करून दिली. याशिवाय कृष्णेचे पाणी मराठवाड्याला देण्याकरता कामाची सुरुवात केली असून बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच मराठवाड्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प वॉटरग्रिड राबवणार आहे. यामध्ये धरणांना एकमेकांशी जोडले जाणार आहे व त्यातून पाणी गावापासून शहरांपर्यंत पोचवले जाईल. साधारणपणे वीस हजार कोटी रुपये या वॉटरग्रिडला लागतील असा अंदाज आहे, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.

फडणवीसांना गुरुदक्षिणा म्हणून अंगठा देण्याची पंकजांची तयारी!

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे राजकीय गुरू असून गुरुदक्षिणा म्हणून त्यांना अंगठा देण्याची आपली तयारी आहे, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगत जाहीरपणे आपली मुख्यमंत्र्यांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. बीडमध्ये महाजनादेश यात्रेच्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव केला. तुमचा देवेंद्र ते नरेंद्र हा प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत, असेही त्या म्हणाल्या.

माझ्या जेव्हा मुलाखती घेतल्या जातात तेव्हा तुमचा गुरू कोण असे मला विचारले जाते. अशावेळी साहजिकपणे माझे वडील माझे गुरू असल्याचे मी सांगते. पण आज ते नाहीत. त्यांच्या पश्चात जर कुणी असेल तर मी सांगते देवेंद्र फडणवीस माझे गुरू आहेत, असे पंकज्या म्हणाल्या.

द्रोणाचार्यांसाठी अर्जुन हा त्याचा प्रिय शिष्य होता. त्याच्यापेक्षा कुणी मोठा होऊ नये यासाठी त्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला. गुरुसाठी अंगठा कापून देण्याच्या परंपरेचे आपण आहोत. मात्र तो अंगठा अर्जुनासाठी होता. तुमच्यासाठी मी एकलव्य होऊन अंगठा द्यायला तयार आहे. पण फक्त तो अर्जुनासाठी असावा, दुसर्‍यांसाठी नाही, असा टोला विनायक मेटे यांचे नाव न घेता पंकजा यांनी मारला.

मुंडे-मेटे वाद चव्हाट्यावर

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि युतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांच्यातील वैर भाजपाच्या महाजनादेश यात्रेतच चव्हाट्यावर आले. महाजनादेश यात्रा सोमवारी बीड जिल्ह्यात दाखल झाली. यात्रा दुपारी बीड शहरात आल्यानंतर आमदार विनायक मेटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी रथात चढले. मेटे येताच दोन्ही मुंडे भगिनी रथातून खाली उतरतून निघून गेल्याने मुंडे आणि मेटे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -