घरमुंबईभाजपा- शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेत श्री रामाचा धनुष्यबाण

भाजपा- शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेत श्री रामाचा धनुष्यबाण

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद यात्रेला सुरूवात झाली. यात्रेत जवळपास १० हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते बाईकवर स्वार होऊन भाजपा - शिवसेना झेंडा फडकवत सहभागी झाले होते. 

 

मुंबई:  घाटकोपर पश्चिमेच्या अमृतनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मुलुंड बाळराजेश्वर मंदिरापर्यंत भाजप-शिवसेनेची आशीर्वाद यात्रा रविवारी काढण्यात आली. अयोध्येतून आणलेला धनुष्यबाण उंचावत या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी हजारोंच्या संख्येने भाजपा – शिवसेनेचे कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले होते. एकूण सहा लोकसभा मतदार संघातून ही यात्रा निघाली.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद यात्रेला सुरूवात झाली. यात्रेत जवळपास १० हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते बाईकवर स्वार होऊन भाजपा – शिवसेना झेंडा फडकवत सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना भाजपा मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार म्हणाले, “भाजप आणि शिवसेना सोबत असून धनुष्यबाण चिन्ह आणि बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व आमच्याबरोबर आहे याचा आनंद आहेच, तसा आनंद जनतेलाही आहे. जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठीच ही यात्रा आहे.” असेही ते म्हणाले. यावेळी आमदार राम कदम, आमदार मिहीर कोटेचा, आमदार पराग शाह यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरळी येथील आशीर्वाद यात्रेत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात ही यात्रा निघाल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

- Advertisement -

दरम्यान, औरंगाबादच्या नामांतरावरून राजकारण पेटले आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी या नामांताराला विरोध केला आहे. नामांतराविरोधात उपोषणाला बसण्याचा इशाराही आमदार जलील यांनी दिला आहे. याला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, कोण इम्तियाज जलील?, त्याचा महाराष्ट्राच्या इतिहासाशी काय संबंध?, छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबत त्यांना काय माहितेय?, या अशा बांडगुळांना आम्ही उत्तर देत नाही, असं आशिष शेलार म्हणाले. आशिष शेलार यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला. नशीब इम्तियाज जलील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे किंवा खैरे गेले नाहीत, असं म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरेंना टोला लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -