घरदेश-विदेशसंसदेची संस्कृती कलंकीत केल्याप्रकरणी भाजपने माफी मागावी; आव्हाडांनी केली मागणी

संसदेची संस्कृती कलंकीत केल्याप्रकरणी भाजपने माफी मागावी; आव्हाडांनी केली मागणी

Subscribe

लोकसभाध्यक्षांनी, संसदेत असंसदीय शब्द वापरून सामाजिक अशांततेला पूरक वातावरण निर्माण करणाऱ्या बिदूर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी इंडिया आघाडीचे प्रवक्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी ठाण्यात एका पत्रकार परिषदेत केली.

ठाणे : भाजपचे दिल्लीतील खासदार रमेश बिधुरी यांनी एका मुस्लीम खासदाराकडे बघून आक्षेपार्ह शब्दप्रयोग केला. ज्या लोकसभेला उज्ज्वल परंपरा आहे. त्या सभागृहात भाजपच्या खासदाराने असे असंसदीय शब्द वापरून सभागृहाची संस्कृती कलंकित केली आहे. विशेष म्हणजे अध्यक्ष ओम बिर्ला हे खासदार बिधुरी यांचे शब्द कामकाजातून काढतही नाहीत. हा प्रकार धर्मनिरपेक्ष लोकशाहीला मारक आहे. त्यामुळे भाजपने या प्रकरणी देशाची जाहीर माफी मागावी अशी मागणी आमदार जिंतेंद्र आव्हाड यांनी केली आहे. (BJP should apologize for tarnishing Parliaments culture Demands made by Awhad)

लोकसभाध्यक्षांनी, संसदेत असंसदीय शब्द वापरून सामाजिक अशांततेला पूरक वातावरण निर्माण करणाऱ्या बिदूर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी इंडिया आघाडीचे प्रवक्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी ठाण्यात एका पत्रकार परिषदेत केली. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन नुकतेच पार पडले. भाजपने सभागृहात महिला विधेयक आणले. ते मंजूरही झाले आहे. पण, हे विधेयक काँग्रेसच्या काळातच मांडण्यात आले होते. या विधेयकात मागासवर्गीय, अल्पसंख्यांक महिलांना कोणतेही स्वातंत्र्य आणि स्थान भाजपने दिलेले नाही. म्हणून ओबीसी, अनुसूचित जाती- जमातींची जनगणना व्हावी, अशी आमची मागणी आहे. कारण, मागासवर्गीय महिलांना जर या विधेयकाचा लाभ झाला तरच खऱ्या अर्थाने समाजाला फायदा होईल. असे आमचे मत आहे. असेही आमदार जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : NARENDRA MODI : पंतप्रधानांनी फॅमिली प्रायव्हेट पार्टी म्हटलेल्या पक्षाने एनडीएसोबत केली युती

धर्माच्या- जातीच्या नावावरून शिव्या देणे ही भारताची संस्कृती आहे का?

आतापर्यंत लोकसभेत सुसंस्कृत मुल्यांचे प्रदर्शन व्हायचे. पण, बोलताना तारतम्य बाळगले जायचे. कधी कोणी असंसदीय शब्द वापरला तर माफी मागितली जायची. पण, या विशेष अधिवेशनाला कलंकित करणारा प्रकार काल भाजपचे दिल्लीतील खासदार रमेश बिधुरी यांनी केला आहे. त्यांनी आपल्या भाषणात खासदार दानीश अली यांना उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यावेळेस भाजपचे ज्येष्ठ नेते खा. रविशंकर प्रसाद हे हसत होते. असे शब्द लोकसभेत वापरले जाऊच शकत नाहीत. आता प्रश्न असा आहे की, एखाद्या समाजाचे, धर्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसाला त्याच्या धर्माच्या- जातीच्या नावावरून शिव्या देणे ही भारताची संस्कृती आहे का? या प्रकाराने जगभरात देशातील असे चित्र उभे राहिले की आपल्या देशात विशिष्ट समाजाला आपण किती अवमानित करीत असतो. याचे आंतरराष्ट्रीय परिणाम आपणाला भोगावे लागणार आहेत. तुम्ही धर्मद्वेष किती वाढवत आहात, हे सबंध देशाने पाहिले आहे. म्हणूनच इंडियाची मागणी आहे की भाजपने देशाची आणि ज्या समाजाचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आदित्य ठाकरेंच्या उंचीवरून आरोप-प्रत्यारोप; रामदास कदमांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणतात…

जातीव्यवस्थेला बळकट करण्याचा प्रयत्न

प्रधानमंत्र्यांनी विश्वकर्मा समाजासाठी कर्ज योजना लागू केली आहे. त्याबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, या योजनेचा अभ्यास केल्यावर असे दिसते की जर तुम्ही जातीने सुतार असाल आणि सुतार काम करत असाल तरच तुम्हाला हे कर्ज मिळणार आहे. एककडे संविधानाच्या माध्यमातून जात व्यवस्था तोडण्यासाठी आपण मागे लागलो होतो. आता पुन्हा जातीव्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या अतिमागास आणि अस्पृश्य म्हणून हीनवल्या गेलेल्या वर्गाकडे व्यवसायच नाहीत. मग, त्यांनी काय करायचे. ज्यांना परंपरागत व्यवसाय सोडून प्रगत शिक्षण घेऊन इंजिनिअर, डॉक्टर व्हायचे असेल तर त्यांना मदत करणार नाही. म्हणजेच या सरकारला जातीव्यवस्था पुन्हा मजबूत करायला निघाले आहेत का? सुताराच्या मुलाने इंजिनिअर होऊ नये, असेच या लोकांनी ठरवले आहे का? आपला सवाल आहे. पंतप्रधान यांच्या नावाने अशी योजना आणून जातीव्यवस्था लादणारी योजना आणताच कशी? सर्व जातीवर्गाने शिक्षण घेऊन प्रगती साधावी, असा आमच्या बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधानिक विचार होता. त्या विचाराला हरताळ फासला जात आहे. एककडे तुम्ही मुस्लिमांना लोकसभेत शिव्या देणार दुसरीकडे ओबीसी- दलितांना व्यवसायात गुंतवून ठेवणार! म्हणजेच तुम्हाला जाती आणि धर्मव्यवस्था मजबूत करायची आहे, असाच अर्थ निघतोय. नवीन संसदेत अशी धर्मद्वेषाची नवीन परंपरा सुरू होत असेल तर ते सहन केले जाणार नाही. आता खा. बिधुरी यांचा पर्यायने भाजपचा धर्मद्वेष उघडकीस आला आहे ,असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -