घरक्राइमभाजपा प्रवक्त्या नुपूर शर्माला पोलीस नोटीस पाठविणार, वादग्रस्त विधानासंदर्भात लवकरच पोलिसांकडून चौकशी

भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्माला पोलीस नोटीस पाठविणार, वादग्रस्त विधानासंदर्भात लवकरच पोलिसांकडून चौकशी

Subscribe

अलीकडेच एका इंग्रजी वृत्तवाहिनीने एका डिबेट शोचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात भाजपाच्यावतीने प्रवक्त्या नुपूर शर्मा या सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासोबत इतर तीन मान्यवर उपस्थित होते. या चर्चेदरम्यान त्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविरुद्ध अत्यंत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive statement against Prophet Mohammad) केले होते.

भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (BJP spokesperson Nupur Sharma) यांना पायधुनी पोलिसांकडून ( paydhuni police) नोटीस (notice) पाठविण्यात येणार आहे. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधनासंदर्भात लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन त्यांची जबानी नोंदविण्यात येणार आहे. याच प्रकरणात अलीकचे त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता.

रझा अकादमीकडून तक्रार

- Advertisement -

भारतीय ज्ञानव्यापी प्रकरण चर्चेचा विषय आहे. अलीकडेच एका इंग्रजी वृत्तवाहिनीने एका डिबेट शोचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात भाजपाच्यावतीने प्रवक्त्या नुपूर शर्मा या सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासोबत इतर तीन मान्यवर उपस्थित होते. या चर्चेदरम्यान त्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविरुद्ध अत्यंत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive statement against Prophet Mohammad) केले होते. या आक्षेपार्ह वक्तव्याची क्लिप नंतर रझा अकादमीच्या पदाधिकार्‍यांना मिळाली होती. यावेळी त्यांच्या वतीने पायधुनी पोलिसांत एका लेखीअर्जाद्वारे नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. त्यात त्यांनी नुपूर शर्मा यांचे वक्तव्य धार्मिक भावना भडकाविणारे असून त्यांच्याविरुद्ध सक्त कारवाई करावी अशी मागणी केली होती.

कठोर कारवाईची मागणी

- Advertisement -

या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत त्यांच्याविरुद्ध भादवी दंड सहिता कलम 295 अ, 153 ब, 505 अ अन्वये गुन्हा दाखल केला होता. याच दरम्यान रझा अकादमीच्या पदाधिकार्‍यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती. या घटनेची आता पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत पायधुनी पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पायधुनी पोलीस नुपूर शर्मा यांना नोटीस बजाविणार आहेत. त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविली जाणार आहे. या जबानीनतर पुढील कारवाई ठरविली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -