घरमुंबईभाजप करणार नालेसफाई कामांची झाडाझडती

भाजप करणार नालेसफाई कामांची झाडाझडती

Subscribe

मुंबई: मुंबई महापालिकेने मार्च महिन्यापासून पावसाळ्यापूर्वी आवश्यक नालेसफाईची कामे सुरू केली आहेत. आतापर्यंत ७५ टक्के नालेसफाईची कामे झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र प्रत्यक्षात नालेसफाई कुठे व कशी करण्यात आली आहे, नालेसफाई किती टक्के झाली, गाळ कसा काढला जात आहे, गाळ कुठे टाकला जातोय या सर्व बाबींची झाडाझडती घेण्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे १२ मे रोजी पश्चिम उपनगरातील नालेसफाई कामांची पाहणी करणार आहेत.

या नालेसफाई कामाच्या पाहणी दौऱ्यात भाजपचे आमदार अमित साटम,आमदार भारती लवेकर,भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा, समन्वयक व प्रवक्ता भालचंद्र शिरसाट आणि पश्चिम उपनगरांतील भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आदी सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

मुंबई महापालिकेत गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. त्यापैकी २० वर्षे भाजप शिवसेनेसोबत सत्तेत होती. मात्र २०१७ च्या पालिका निवडणुकीत शिवसेना व भाजप एकमेकांच्या विरोधात लढले. भाजप सत्तेपासून दोन हात दूर राहिली. त्यामुळे भाजप व शिवसेनेत पालिकेच्या कामकाजावरून काटेकी टक्कर सुरू होती. ७ मार्च रोजी महापालिकेची मुदत संपली. तत्पूर्वी निवडणूक घेणे आवश्यक असतानाही ती राजकीय कारणामुळे घेण्यात आली नाही.आता पावसाळ्यानंतरच निवडणूक होईल. अशा सर्व परिस्थितीमध्ये, भाजपने गेल्या पाच वर्षात सत्ताधारी शिवसेनेवर विविध विकासकामांवरून टीकाटिपणी करून व भ्रष्टाचाराचे आरोप करून वारंवार कोंडी करण्याचा प्रयत्न केला. नालेसफाईच्या कामांवरूनही भाजपने सतत पालिका प्रशासनाच्या कामांबाबत असमाधान व्यक्त करून सत्ताधारी शिवसेनेवर आरोपांच्या फैरी झाडत जेरीस आणले.

आता यंदा महापालिकेने मार्च महिन्यापासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात केली. महापालिकेने नालेसफाईच्या कामांबाबत कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांची कामे दिली आहेत. आतापर्यंत शहर व उपनगरे या ठिकाणी लहान, मोठे नाले, नद्या आदींच्या ठिकाणी ७७..०२ टक्के नालेसफाई केली असून त्यामधून ७५४६६३.२० मे.टन इतका गाळ काढण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे.

- Advertisement -

नालेसफाई कामांची टक्केवारी
# शहर भागात -: ६५.८० टक्के
# पश्चिम उपनगर -: ८२.२१ टक्के
# पूर्व उपनगर -: ८०.३६ टक्के
# मिठी नदी -: ६१.५९ टक्के
# लहान नाले -: ८३.१८ टक्के
# हायवे लगतचे नाले -: ७६.७१ टक्के
– – – – — – — — – — – — — – ———————
एकूण नालेसफाई -: ७७.०२ टक्के

पश्चिम उपनगरातील खालील ठिकाणी करणार नालेसफाई कामाची पाहणी 

# साऊथ एव्हेन्यू नगर येथील नाला

# गझदर बंध नाला

# पवन हंस नाला व एस.एन.डी.टी. नाला

# गजधर बंध पंपिंग स्टेशन

# इर्ला नाला

# मोगरा नाला

# मेघवाडी नाला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -