भाजपचे 50 टक्क्यांपेक्षा जास्त गुजराती नगरसेवक; मराठीबाबत उपदेश देऊ नये- यशवंत जाधव

ज्या भाजपने मुंबई महापालिकेत ८२ नगरसेवकांपैकी ४८ नगरसेवक गुजराती भाषिक दिलेत त्यांनी शिवसेनेला मराठी भाषा, नावांबाबत उगाचच उपदेश देऊ नये, अशी टीका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपवर केली आहे. भायखळा राणीच्या बागेत जन्मलेल्या पेंग्विनच्या एका पिल्लाचे नाव मराठी भाषेतील न ठेवता' ऑस्कर' असे इंग्रजी भाषेतील नाव ठेवल्याने भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

BJP's more than 50 per cent Gujarati corporators; Don't preach about Marathi - Yashwant Jadhav

भायखळा राणीच्या बागेत जन्मलेल्या पेंग्विनच्या एका पिल्लाचे नाव मराठी भाषेतील न ठेवता’ ऑस्कर’ असे इंग्रजी भाषेतील नाव ठेवल्याने भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात आली.त्यावर ज्या भाजपने मुंबई महापालिकेत 82 नगरसेवकांपैकी 48 नगरसेवक गुजराती भाषिक दिलेत त्यांनी शिवसेनेला मराठी भाषा, नावांबाबत उगाचच उपदेश देऊ नये, अशी टीका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपवर केली आहे.

जगात सर्वात मोठा पुरस्कार म्हणून ऑस्कर पुरस्काराचे नाव आहे. हा पुरस्कार ज्यांना दिला जातो ते त्यासाठी स्वतःला धन्य समजतात. मराठी भाषेबाबत शिवसेना सुरुवातीपासून आग्रही राहिली आहे. मराठीसाठी लढणारी शिवसेना आहे. शिवसेना – मराठी हे सुरुवातीपासूनचे घट्ट नाते आहे. त्यामुळे भाजपने आम्हाला मराठी भाषा,नावे यांबाबत उगाच धडे देऊ नयेत. त्यांना मराठी ऐवजी गुजराती भाषेत नावे, मेसेज, पाट्या कशा काय चालतात ? असा सवाल यशवंत जाधव यांनी उपस्थित केला आहे.

भाजपवाले गेली 25 वर्षे सत्तेसाठी शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसले होते, तेव्हा त्यांना मराठी भाषा वगैरे असे काही दिसले नाही. आता राज्यात आणि मुंबई महापालिकेत त्यांच्या हातामधून सत्ता गेल्यानंतर त्यांचा मराठी भाषेबाबतचा अभिमान जागृत झाला काय ? असा सवालही यशवंत जाधव यांनी उपस्थित केला आहे.


हेही वाचा – BrahMos Missile : ओडिशाच्या किनार्‍यावर ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाचणी