घरताज्या घडामोडीपोलिसांना शिवीगाळ करणे वरुण सरदेसाईंना भोवणार

पोलिसांना शिवीगाळ करणे वरुण सरदेसाईंना भोवणार

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत कानशिलात लगवण्याचे वक्तव्य केल्यामुळे राज्यातील राजकारण काल, मंगळवारी चांगलंच तापलं होत. राज्यातील अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी आक्रमक पावित्रा घेतला होता. तसेच मुंबईतही जुहू येथील नारायण राणे यांच्या बंगल्या जवळ शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी आदित्य ठाकरेंचा मावसभाऊ आणि युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे युवासेनेच्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. या आंदोलनादरम्यान शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक, शिवगाळी सुरू केली. आंदोलन खूपचं चिघळले. परिस्थिती हात बाहेर जात असल्यामुळे पोलीस सर्व कार्यकर्त्यांना मागे जाण्यास सांगत होते. मात्र यावेळी वरुण सरदेसाई पोलिसांना शिवीगाळ करताना दिसले. त्यामुळे सध्या वरुण सरदेसाईंवर एफआयआर दाखल करा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाकडून केली जात आहे.

वरुण सरदेसाई यांचा पोलिसांना शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहे. एका मराठी वृत्तवाहिनीवरील हा व्हिडिओ असून त्यामध्ये पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नात असताना वरुण सरदेसाई लाईव्ह सुरु असतानाच शिवीगाळ करताना आहेत. त्यामुळे आता भाजयुमो मुंबईचे अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांनी पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी वरुण सरदेसाई यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

तेजिंदर सिंह तिवाना यांनी निवेदनात म्हटले आहे की, पोलिसांनी जर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे तर त्यांनी वरुण सरदेसाई यांच्याविरोधातही एफआयआर नोंदवावा. जर पोलिसांना एफआयआर नोंदवला नाही तर भाजयुमो आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जामीन मिळताच नारायण राणे यांच पहिले ट्वीट, ‘सत्यमेव जयते’


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -