घरताज्या घडामोडीबीकेसी कोविड सेंटरला तौत्के वादळाचा तडाखा, पालिकेने रातोरात रुग्णांना हलवल्याने अनर्थ टळला

बीकेसी कोविड सेंटरला तौत्के वादळाचा तडाखा, पालिकेने रातोरात रुग्णांना हलवल्याने अनर्थ टळला

Subscribe

कोविड सेंटरचे टेंट वाऱ्यामुळे उखडले

अरबी समुद्रात तयार झालेले तोत्के चक्रीवादळ आता मुंबईच्या किनारपट्टीवर घोंघावत आहे. तोत्के चक्रीवादळ मुंबई महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असताना प्रशासाने सर्व यंत्रणांना अलर्ट कलेले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तयार करण्यात आलेल्या बीकेसी कोविड सेंटरला या चक्रीवादळामुळे सुटलेल्या वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. परंतु पालिकेच्या प्रसंगावधानामुळे कोविड सेंटरमधील रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलविल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मुंबईत सकाळीपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार वारे वाहत असल्यामुळे बीकेसी केविड सेंटरचा काही भाग उखडला गेला आहे.

मुंबईत तयार करण्यात आलेल्या बीकेसी कोविड सेंटरमध्ये मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत होता. तसेच नागरिकांचे कोरोना लसीकरणही याच ठिकाणी करण्यात येत होते. परंतु हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजामुळे आणि वादळी वाऱ्याचा विचार करता मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी तेथील कोरोना रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

मुंबई महानगर पालिकेने मुंबई, दहीसरमधील कोविड सेंटरमधील ५८१ रुग्ण इतर रुग्णालयात दाखल केले आहेत. बीकेसी कोविड सेंटरला वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसला आहे. यो कोविड सेंटरचे टेंट वाऱ्यामुळे उखडले गेले आहेत. काही भागाचे छप्पर उडाले आहे. कोविड सेंटरमधील कर्मचारी अधिक नुकसान होऊ नये यासाठी कोविड सेंटरमधील वस्तू बाजूला काढून ठेवत आहेत.

पालिकेने बीकेसी कोविड सेंटरमधील २४३ रुग्णांना नेस्को आणि अन्य रुग्णालयात दाखल केले आहे. तर दहिसरमधील १८४ रुग्णांना नेस्को, अंधेरी, मरोळ इतर रुग्णालयात दाखल केले आहे. मुलूंडमधील १५४ रुग्णांना मीठाघर तसेच जकात नाका येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईत तयार करण्यात आलेले कोविड सेंटर हे एखाद्या टेंट सारखे होते. यामुळे पावसाचा तसेच जोदार वऱ्याचा या कोविड सेंटरला तडाखा बसणार हे निश्चित होते. मागील वर्षीच्या पावसात या कोविड सेंटरला तडाखा बसल्यामुळे यावर्षी पालिकेने चांगला निर्णय घेऊन रुग्णांना वेळीच दुसऱ्या रुग्णालयात दाखल केल्यामुळे जिवितहानी टळली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -