Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुणे पुण्यात चितेजवळ तृतीयपंथींचा 'रात्रीस खेळ चाले'

पुण्यात चितेजवळ तृतीयपंथींचा ‘रात्रीस खेळ चाले’

Subscribe

वैकुंठ स्मशानभूमीत हा प्रकार घडला. शुक्रवारी रात्री १ च्या सुमारास एका मृतदेहावर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दोन तृतीयपंथी चितेजवळ आले. काळ्या रंगाच्या बाहुल्या, काही फोटो, लिंबू, सुया, हळदी कुंकू असे साहित्य त्यांनी सोबत आणले होते. तेथे त्यांनी जादूटोणा करण्यास सुरुवात केली. स्मशानभूमीतील एका कर्मचाऱ्याच्या निदर्शनास ही बाब आली. मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. 

पुणेः पुण्यातील स्मशानभूमीत चितेजवळ दोन तृतीयपंथीय जादुटोणा करत असल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. जादुटोणा करणाऱ्याना तृतीयपंथीयांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला एक तृतीयपंथीय मुंबईतला आहे.

वैकुंठ स्मशानभूमीत हा प्रकार घडला. शुक्रवारी रात्री १ च्या सुमारास एका मृतदेहावर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दोन तृतीयपंथी चितेजवळ आले. काळ्या रंगाच्या बाहुल्या, काही फोटो, लिंबू, सुया, हळदी कुंकू असे साहित्य त्यांनी सोबत आणले होते. तेथे त्यांनी जादूटोणा करण्यास सुरुवात केली. स्मशानभूमीतील एका कर्मचाऱ्याच्या निदर्शनास ही बाब आली. मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली.

- Advertisement -

या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही तृतीयपंथींना अटक केली. यातील एक तृतीयपंथीय मुंबईतला असून दुसरा पुण्यातील आहे. लक्ष्मी निबाजी शिंदे (मुंबई) आणि मनोज अशोक धुमाळ (पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या तृतीयपंथींची नावे आहेत.

या दोघांची पोलीस चौकशी करत आहेत. हे दोघेजण नेमके काय करत होते. कोणाच्या सांगण्यावरुन करत होते. त्यांच्यासोबत कोणी होते का याची पोलीस चौकशी करत आहेत. शुक्रवारी अमवस्या होती. अमवस्याच्या दिवशी जादूटोण्याचे प्रकार अधिक होतात. काही अघोरी प्रकारही केले जातात. त्याला प्रतिबंध करण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली होती. विविध सामाजिक संघटनांनीही यासाठी सरकारकडे निवेदन दिले होते. अंधश्रद्धेविरोधात प्रचार व प्रसार करणाऱ्या नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

- Advertisement -

त्यानंतर राज्य शासनाने अंधश्रद्धा निर्मुलनाचा कायदा केला. जादूटोणा करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतुद कायद्यात करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी कारवाईही सुरु केली. मात्र तरीही जादूटोण्याचे प्रकर हे सुरुच आहेत. प्रेम, संपत्ती, विवाह अशा विविध समस्यांवर तत्काळ व हमखास उपाय देणाऱ्या बंगाली बाबांचे खेळ अजूनही थांबलेले नाहीत. त्यात पुण्याच्या स्मशानभूमीत झालेल्या जादूटोण्याच्या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलीस कारवाई अधिक तीव्र करावी, अशी मागणी होत आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -