घरताज्या घडामोडीकोरोना रुग्णांची लूट; बोरिवलीतील एपेक्स रुग्णालयावर कारवाई

कोरोना रुग्णांची लूट; बोरिवलीतील एपेक्स रुग्णालयावर कारवाई

Subscribe

कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर अनेक रुग्णांची लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशाप्रकारे तक्रारी प्राप्त झालेल्या बोरिवलीतील एपेक्स रुग्णालयांवर महापालिकेने कारवाई केली आहे. बोरिवलीतील दोन्ही रुग्णालयांमध्ये यापुढे कोविड रुग्ण दाखल करण्यास निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे येथील रुग्णालयात आता कोविड रुग्णांना दाखल करण्यास बंदी घालण्यात आली असली तरी रुग्णांची लूट केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

कोरोना विषाणू उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून अवाजवी आकारणी (बील) होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्यानंतर, मुंबई महानगरपालिका प्रशासनाने विविध खासगी रुग्णालयांसाठी महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक खात्यातील, लेखापरीक्षकांची नेमणूक केली आहे. तेव्हापासून ३७ रुग्णालयांतील ६२५ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. तसेच रुग्णालयात नेमून दिलेल्या लेखा परीक्षकांनी अन्य ४९० तक्रारींमध्ये देखील कार्यवाही केली आहे. अशा एकूण १ हजार ११५ तक्रार प्रकरणात नियमानुसार कार्यवाही केल्याने सुमारे १ कोटी ४६ लाख ८४ हजार रुपये रकमेची आजवर परतफेड करण्यात आली आहे. यातून रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

महापालिकेने खासगी रुणालयात ऑडीटर नेमले असले तरी काही खासगी रुग्णालयांनी रुग्णांची लूट चालवली होती. अशाप्रकारे बोरिवलीतील दोन्ही एपेक्स रुग्णालयात रुग्णांची लूट सुरू असल्याच्या तक्रारी येत असल्याने मुंबई महापालिकेच्या आर/ मध्य विभागाच्यावतीने या रुग्णालयाची तपासणी करून जेवढे रुग्ण दाखल आहेत, तेवढ्याच रूग्णांवर उपचार करून हे रुग्णालय नॉन कोविड करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे या रुग्णालयांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असून त्यांना या रुग्णालयातील सर्व रुग्णांवर उपचार पूर्ण झाल्यानंतर हे रुग्णालय नॉन कोविड करण्यात येईल, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कांदिवलीतील सचिन तेंडुलकर क्रीडा संकुलाशेजारी असलेल्या पावनधाममध्ये भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य केंद्र उभारण्यात आले. या केंद्राला विविध स्तरावरुन अनुदान आणि देणगी उपलब्ध होत असूनही येथील रुग्णांना ५० ते ७० हजार रुपयांची आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. या ठिकाणी गरीब रुग्ण Admit होत असतात. एकाबाजूला पावनधामला देणगी मिळत असताना रुग्णांना या ठिकाणी मोफत उपचार मिळायला हवे, अशी रुग्णाकडून मागणी होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -