मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी कोरोना पॉझिटिव्ह, सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू

bmc additional commissioner suresh kakani corona positive
मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना कोरोनाची लागण झाली (Suresh kakani corona positive) असून त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. काकाणी यांना गुरुवारी ताप आला आणि अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण झाले. त्यानंतर त्यांना अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबईतील कोरोनाच्या लढाईत गेल्या दीड वर्षापासून पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या नेतृत्वाखाली सुरेश काकाणी आरोग्य विभागाची संपूर्ण जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळत आहेत. पहिल्या दिवसापासून काकाणी कोरोनाच्या लढाई स्वतः झोकून घेतलं आहे. कोरोना लसीकरणांपासून सर्व मोहिमेवर त्यांचे बारकाईने लक्ष आहे. यामुळेच प्रचंड लोकसंख्या असलेल्या मुंबईतील कोरोना आटोक्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबईत काल २६७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर ३०८ रुग्ण बरे होऊन गेले होते. आता मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ३९ हजार ३३६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १५ हजार ९८९ मृत्यू झाले असून ७ लाख १८ हजार ८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत २ हजार ८३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आता मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही आहे.


हेही वाचा – Mumbai Unlock : मुंबईतील उद्याने, मैदाने, चौपाट्या सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत राहणार सुरु