Corona: मुंबईतील सोसायट्यांसाठी पालिकेची नवीन नियमावली

proposal to exempt soldiers' property from property taxes was shelved
सैनिकांच्या मालमत्तांना मालमत्ता करात सूट देण्याचा प्रस्ताव लटकला

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे सध्या मुंबईतील इमारतींमध्ये कोरोबाधित रुग्ण अधिक प्रमाणात असून अनेक इमारती सील करण्यात आल्या आहेत. ९० टक्के रुग्ण हे इमारतींमधील आहेत. त्यामुळे महापालिकेने आता या निवासी सोसायट्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे तयार केली आहे.

मुंबईतील एखाद्या सोसायटीमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास ती इमारत सील केली जाते. त्यानुसार आतापर्यंत ६८१ इमारती सील करण्यात आल्या आहेत. तर ८ हजार इमारतींचे मजले देखील सील करण्यात आले आहेत. ही चिंतेची बाब असून या कोरोनाचा अधिक संसर्ग होऊ नये, याकरता मुंबई महापालिकेने नवीन मार्गदर्शक तत्वे काढण्यात आली आहेत.

काय आहेत मार्गदर्शक तत्वे

 • इमारतीत वावरताना प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक
 • नियमांचे पालन होत असल्याची खातरजमा करावी
 • घराच्या बाहेर पडताना मास्क, सॅनिटाझर, मास्क आणि हातमोज्यांचा वापर करणे बंधनकारक
 • लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये
 • इमारतीत दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फुटाचे अंतर राखून संवाद साधावा
 • प्रतीक्षागृहाचा शक्यतो उपयोग करु नये
 • सोसायटीत दरवाज्याची कडी, कठडे, लिफ्ट, बाक, वाहनतळ अशा ठिकाणी कुठेही हात लावू नये
 • लिफ्टचा वापर करताना हातात कागद ठेवावा
 • सोसायटीमध्ये किंवा परिसरात बाहेरील कोणत्याही व्यक्तीला शक्यतो थेट प्रवेश देऊ नये
 • बाहेरुन येणारे मदतनीस, वाहन चालक, कचरा संकलक, सफाई कर्मचारी यांच्यासाठी शारीरिक तापमान तपासणी, प्राणवायू तपासणी, हात स्वच्छ धुण्याची सोय आदी बाबी उपलब्ध कराव्यात
 • ऑनलाईन पार्सल सोसायटीच्‍या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाकडे ठेवण्‍याची व्‍यवस्‍था करावी
 • सोसायटीतून बाहेर पडताना वाहनांना स्‍पर्श करण्‍यापूर्वी त्‍यांचे निर्जंतुकीकरण करावे
 • स्थानिक महापालिका आरोग्य केंद्र, रुग्णालय, विभागस्तरीय नियंत्रण कक्ष असे महत्‍त्‍वाचे संपर्क क्रमांक ठळकपणे सोसायटी परिसरात प्रदर्शित करावे

  हेही वाचा – Corona: मुंबईतील ‘हे’ आहेत कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट