Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भाजपच्या विरोधाला न जुमानता ७१ कोटी खर्चून फुटपाथ दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर

भाजपच्या विरोधाला न जुमानता ७१ कोटी खर्चून फुटपाथ दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर

शहर व उपनगरातील ८ रस्त्यांवरील पदपथ दुरुस्ती व सुधारणा करण्यासाठी पालिकेने दोन ७१ कोटी रुपयांचे दोन प्रस्ताव मंजुरील आणले.

Related Story

- Advertisement -

मुंबई शहर व उपनगरे येथील काही पदपथांच्या दुरुस्तीसाठी ७१ कोटी रुपये खर्च करण्याबाबतच्या प्रस्तावांना पालिकेतील पहारेकरी भाजपने विरोध दर्शविला होता ; मात्र सत्ताधारी शिवसेनेने भाजपच्या विरोधाला न जुमानता विरोधी पक्षांची साथ घेऊन बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे भाजपणे तीव्र नाराजी व्यक्त केली. पालिकेने कोरोनाच्या कालावधीत केवळ काही ठिकाणच्या पदपथांच्या दुरुस्तीचे काम कंत्राटदाराला देणे व त्यासाठी सल्लागारावर दीड कोटींची उधळपट्टी करणे चुकीचे आहे, असे सांगत पहारेकरी भाजपने सदर प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रस्ताव मंजुरीला टाकून व त्यावर मतदान घेऊन तो प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला.

शहर व उपनगरे येथील काही पदपथांची बिकट आहे. त्यातच फेरीवाले पदपथावर अतिक्रमण करून बसतात. त्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालणे कठीण होते. राज्याचे पर्यावरण, पर्यटन व पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने शहर व उपनगरातील ८ रस्त्यांवरील पदपथ दुरुस्ती व सुधारणा करण्यासाठी पालिकेने दोन ७१ कोटी रुपयांचे दोन प्रस्ताव मंजुरील आणले. चेंबूर, महर्षी दयानंद सरस्वती मार्ग, चेंबूर स्टेशन ते डायमंड ग्राउंड आणि वडाळा येथील लेडी जहांगीर रोड, सेंट जोसेफ सर्कल , वडाळा स्टेशन ते रुईया महाविद्यालय या पदपथांचे सुशोभीकरण व सुधारणा करण्याचे काम करण्यात येणार आहे. तर पी / दक्षिण विभागातील महात्मा गांधी रोड, एच/ पूर्व विभागातील आर.के.पी. रस्ता व संत ज्ञानेश्वर मंदिर रस्त्यालगतच्या पट्ट्यांची आणि पदपथांची मास्टिक व सिमेंट काँक्रीट मध्ये सुधारणा व सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

मुंबईतील अनेक रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. काही नगरसेवकांनी सुचवलेले रस्ते सुद्धा अद्याप हाती घेतले जात नाही. त्या रस्त्यांची कामे आधी हाती घ्या व मगच सदर पदपथाचा प्रस्ताव मंजूर करा, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी करीत पदपथाच्या प्रस्तावाला विरोध केला. मात्र स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले की, हा प्रस्ताव प्रशासनाने आणला अडून त्यास चुकीच्या मुद्द्यांच्या आधारे विरोध केला जात आहे. ज्या रस्त्यांची कामे राहिली ती सुद्धा करण्यात यावीत, असे निर्देश प्रशासनाला दिले. मात्र भाजपने आपला विरोध कायम ठेवल्याने यशवंत जाधव यांनी बहुमताने प्रस्ताव मंजूर केला.


हेही वाचा : महानिर्मिती राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार


- Advertisement -

 

- Advertisement -