घरमुंबईमुंबईतील छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी ६४ कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी

मुंबईतील छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी ६४ कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी

Subscribe

या बैठकीत मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरातील छोट्या नाल्यांच्या सफाई कामांबाबतचे काही प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आले.

पावसाळा जवळ आल्याने मुंबई महापालिकेने मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामांना आधीच सुरुवात केली आहे. आतापर्यंत ३० टक्केपेक्षाही जास्त नालेसफाईची कामे झाली आहेत. मात्र, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील छोट्या नाल्यांच्या सफाई कामांबाबतच्या ६४ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना आज स्थायी समितीच्या ऑनलाईन बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली. यासंदर्भांतील माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली आहे.

मुंबईमध्ये सध्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्णालयात बेड, आयसीयू बेड, ऑक्सिजन, रक्त, प्लाझ्मा यांची कमतरता आदी कारणांमुळे पालिका मुख्यालयात महासभा, गटनेता बैठका होत नव्हत्या. मात्र, स्थायी समितीची बैठक आणि विविध समितीच्या बैठका सामाजिक अंतर राखून पालिका सभागृहात घेतल्या जात होत्या. परंतु, आता फेब्रुवारीच्या मध्यापासून मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे स्थायी समितीची बैठक शुक्रवारी ऑनलाईन घेण्यात आली. यासंदर्भातील प्रकरण भाजपने कोर्टात नेऊन ऑनलाईन बैठकीला विरोध केला होता. मात्र, कोर्टाच्या आदेशानेच आज ऑनलाईन बैठक पार पडली.

- Advertisement -

या बैठकीत मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरातील छोट्या नाल्यांच्या सफाई कामांबाबतचे काही प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आले. अंदाजे ६४ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

महापौरांसह यशवंत जाधव करणार नालेसफाई कामांची पाहणी

मुंबईत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामांना सुरुवात करण्यात आली आहे. या नालेसफाई कामांची पाहणी शनिवारी महापौर किशोरी पेडणेकर व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे पाहणी करणार आहेत. नालेसफाईची कामे कशी सुरू आहेत, किती प्रमाणात नालेसफाई झाली आहे, याबाबतची पाहणी करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -