BMC Budget 2021: सहआयुक्तांनी पाणी समजून घेतला सॅनिटायझरचा घोट; बघा व्हिडिओ

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. पण या अर्थसंकल्पाची चर्चा होत नसून पाणी समजून सॅनिटायझर प्यायलेल्या सहआयुक्त रमेश पवार यांचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

देशातल्या सर्वात श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प आज बुधवारी सादर करण्यात आला. मुंबईसारख्या मोठ्या शहरात कोरोना महामारीच्या संकटानंतर सादर करण्यात आलेला मुंबई महापालिकेचा हा पहिलाच अर्थसंकल्प. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. पण या अर्थसंकल्पाची चर्चा होत नसून पाणी समजून सॅनिटायझर प्यायलेल्या सहआयुक्त रमेश पवार यांचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

असा घडला प्रकार

कोरोना महामारीच्या संकटानंतर हा अर्थसंकल्प सादर होत असल्याने सकाळपासून मुंबईकर टिव्हीकडून डोळे लावून होते. दुपारी १२ वाजता सुरू होणारा अर्थसंकल्प १५ मिनिटं सभागृहात उशीरा सुरू झाला. यामुळे सभागृहात वृत्त वाहिन्यांते कॅमेरे देखील सरसावले. नंतर शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांना सहआयुक्त रमेश पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर मान्यवर मंडळी स्थानापन्न झाले. सवयी प्रमाणे सहआयुक्तांनी समोर ठेवलेल्या बाटलीतील पाण्याचा घोट घेतला आणि तेवढ्यात त्यांच्या लक्षात आले की, ते पाणी नसून आपण सॅनिटायझरचा घोट घेतला आहे. यामुळे त्यांची चांगलीच धांदल उडाली. झालेला प्रकार त्यांच्या मागे उभे असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी पवारांना अडवले. झालेल्या प्रकारामुळे बाजूला बसलेल्या संध्या दोषीही भांबावल्या.

त्यानंतर पवारांनी पाण्याचा घोट घेतला आणि त्वरीत सभागृहाबाहेर जाऊन चूळ भरून काही न झाल्याचे दर्शवत पुन्हा आपल्या जागी येऊन स्थानापन्न झाले. मात्र हा क्षण सभागृहातील वृत्त वाहिन्यांच्या कॅमेऱ्यांनी कैद केला आणि नेहमी प्रमाणे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धूमाकूळ घालू लागला. दरम्यान, महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून चुकून सॅनिटायझर प्यायल्याचा प्रकार घडला.

बघा हा व्हिडिओ