घरताज्या घडामोडीBMC Budget 2021 : खुशखबर! आता मुंबईची तुंबईतून सुटका

BMC Budget 2021 : खुशखबर! आता मुंबईची तुंबईतून सुटका

Subscribe

यंदाच्या मुंबई अर्थसंकल्पात पर्जन्य जलवाहिन्यांकरता ३४७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

पावसाळ्यात मुंबईची बऱ्याचदा तुंबई झालेली आपण पाहिली आहे. मात्र, यंदा यातून मुंबईची सुटका होण्याची शक्यता आहे. कारण पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा जलदगतीने निचरा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे सुधारण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. या पर्जन्य कामासाठी ३४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून हाती घेण्यात आलेल्या ५८ कामांपैकी ४० कामे पूर्ण झाली आहेत. तर १५ कामे प्रगतीपथावर असून ३ कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पात (BMC Budget 2021) पर्जन्य जलवाहिन्यांकरता महत्त्वाची तरतूद केली आहे.

यामुळे नागरिकांना मिळाला होता दिलासा

२०२० च्या पावसाळ्या दरम्यान, पाण्याचा जलदगतीने निचरा होण्याच्या दृष्टीने हाजीअली, लव्हग्रोव्ह, इर्ला, ब्रिटानिया, क्लीव्हलँड आणि गझधरबांध येथील एकूण ६ उदंचन केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत होती. ६ उदंचन केंद्रांवर २५८ m3/sec क्षमतेचे एकूण ४३ पंप लावण्यात आले. त्यामुळे भरतीच्या वेळी मोठा पाऊस पडून सुद्धा पाणी न साचल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला.

- Advertisement -

पोर्टेबल उदंचन पंप

मुंबईतील सखल भागामधील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी शहर आणि उपनगरमध्ये विविध ३०८ ठिकाणी ३७.५० कोटी एवढी रक्कम खर्च करुन पाण्याचा उपसा करणारे पोर्टेबल उदंचन पंप लावण्यात आले. तसेच, सन २०२० च्या पावसाळ्यामध्ये जम्बो कोविड-१९ सेंटर येथे पावसाळी पाण्याचा उपसा करणारे २१ उदंचन पंप, रेल्वे कल्व्हर्ट येथे ७ उदंचन पंप आणि इतर सखल भागात ५८ उदंचन पंप अशा एकूण ८६ ठिकाणी अतिरिक्त उदंचन पंप लावण्यात आले.

खात्याने केलेली प्रमुख कामे

  • वालभट/ओशीवरा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा भाग असलेले के-पश्चिम विभागातील एस.व्ही.रोड ते लिंक रोड पर्यंतच्या ओशीवरा नदीच्या भागाच्या रुंदीकरणासह संरक्षण भिंतीचे काम.
  • के-पश्चिम विभागातील अंधेरी (पूर्व) येथील कोलडोंगरी नाला वळविणे आणि रुंदीकरणासह संरक्षण भिंतीच्या कामामुळे एन.एस फडके रोड आणि आसपासच्या परिसराला पूरपरिस्थितीपासून दिलासा मिळाला आहे.
  • मध्य रेल्वे ते जी.ए.लिंक रोड पर्यंतच्या पेटीका नलिकेचे पुन:र्बांधकाम करण्यात आल्यामुळे एस विभागातील लक्ष्मीनगर आणि रामेश्वर सोसायटी भागास पूरपरिस्थितीपासून दिलासा मिळाला आहे.
  • एफ/दक्षिण विभागात हिंदमाता जवळील बी.जे.देवरुखकर मार्ग ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड वरील मडकेबुवा चौक येथील विद्यमान आर्च नलिकेचे आरसीसी पेटिका नलिकेमध्ये रुपांतर करण्यात आले. एफ/उत्तर विभागातील प्रतिक्षा नगर भागातील रस्ते, गटारे आणि पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सुधारणा करण्याचे काम करण्यात आल्यामुळे हिंदमाता आणि प्रतिक्षा नगर परिसरात पूरपरिस्थितीपासून दिलासा मिळाला आहे.

प्रगतीपथावर असलेली कामे

भायखळा परिसरात पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी ई विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड ते रे रोडपर्यंत ई एस. पाटणवाला रोड वरील ४.० मी ३.० मी. आकाराची पेटिका नलिका बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दादर टी.टी. भागातील पाणी साचण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी एफ/उत्तर विभागातील दादर टी.टी. आणि मंचेरजी जोशी रोड वरील पर्जन्य जलवाहिन्यांच्या क्षमतेत वाढ करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तर एम.जी.रोड पासून लिंक रोड पर्यंत पोईसर नदी वळविणे आणि रुंदीकरणाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर आर/दक्षिण विभागातील कांदिवली पश्चिम येथील डहाणूकरवाडी परिसराला पूरपरिस्थितीपासून दिलासा मिळेल.

- Advertisement -

हेही वाचा – BMC Budget 2021: कोस्टल रोडसाठी मेगा बुस्टर, यंदा २ हजार कोटींची तरतूद


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -