घरमुंबईBMC Budget 2022 : महापालिकेच्या शाळांमधील आगीच्या घटना रोखण्यासाठी 2.64 कोटींची तरतूद

BMC Budget 2022 : महापालिकेच्या शाळांमधील आगीच्या घटना रोखण्यासाठी 2.64 कोटींची तरतूद

Subscribe

शाळांमध्ये बोलक्या संरक्षक भिंतींची निर्मिती करणार

मुंबई महानगरपालिकेचा सन 2022- 23 चे अर्थसंकल्पीय अंदाज आज सादर करण्यात येत आहे. यात सर्वप्रथम महापालिकेने शिक्षण समितीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. उपायुक्त अजित कुंभार यांच्याकडून शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोषी यांना अर्थसंकल्प सादर केला. मुंबई महापालिकेचे यंदाच्या वर्षीचे शिक्षण बजेट ३ हजार ३७० कोटी २४ लाख रुपयांचे आहे. दरम्यान या अर्थसंकल्पात मुंबईतील वाढत्या आगीच्या घटना पाहता पालिकेतील शाळांमध्ये असा प्रकार घडू नये यासाठी विशेष तरतूदी करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात 2.64 कोटींची तरतूद केली आहे. यातून पालिका शाळांसाठी आधुनिक अग्निशामक साहित्य / उपकरणांची खरेदी करणार आहे.

महानगरपालिकेच्या सर्व शालेय इमारती करिता अग्निशमन यंत्रे पुरविण्यात आले आहेत. मात्र सद्या बाजारात सुलभ व सुरक्षित अशी ५०० मि.लि. ची जेटकुल जेल अग्निशमक यंत्रे उपलब्ध असून त्याद्वारे आग जलदगतीने विझवली जाऊन झटपट कूलींग होते. बर्निंग तापमान १००० से. असले तरीही ते ३० से. पर्यंत कमी केले जावू शकते. सदर यंत्र वापरास सुलभ व सोपे असल्याने याचा उपयोग विद्यार्थी देखील करु शकतील.

- Advertisement -

महानगरपालिका शाळांमधील वर्ग खोल्या, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळ कार्यालय इ. ठिकाणी वापर करण्यासाठी काही ठराविक शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर जेटकुल जेल अग्निशमक यंत्रे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाच्या शिफारशी नंतर खरेदी करण्यात येणार आहेत.

शाळांमध्ये बोलक्या संरक्षक भिंतींची निर्मिती करणार

विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील एखादी संकल्पना स्पष्ट करित असताना सदर आशयाचे चित्र दाखविले असता ती संकल्पना विद्यार्थ्यांस लवकर समजते. शालेय इमारतीच्या संरक्षक भिंतीवर आतल्या बाजूस विद्यार्थ्यांना शैक्षणिक, नैतिक मूल्ये व सामाजिक जबाबदारीचे संदेश देणारे चित्र चित्रित करण्यात येणार आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट नजरेस आणून दिल्याने विद्यार्थ्यांची आकलन व अध्ययन क्षमता वाढेल. त्याचप्रमाणे शालेय इमारत व परिसर सुशोभित होईल. शाळांतील रंगकामामुळे स्वच्छता राखली जाऊन शैक्षणिक वातावरणही चांगले होईल. यासाठी अर्थसंकल्पात ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे


BMC Budget 2022 Live Updates : पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -