घरमुंबईआरेतील मुख्य रस्त्याचे होणार सिमेंट काँक्रिटीकरण

आरेतील मुख्य रस्त्याचे होणार सिमेंट काँक्रिटीकरण

Subscribe

आरेतीलbmv दिनकर देसाई रस्ता मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत गेल्यानंतर या मार्गावरुन सुखकर प्रवास करणे प्रवाशांना सोयीस्कर झाले. परंतु जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी ७.२ किलो मीटर लांबीचा हा मुख्य रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा करण्यात यावा या केलेल्या विनंतीला मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री तसेच पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे याांनी मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हा सिमेंट कॉंक्रीटचा बनविण्यात येणार आहे. यासाठी ४६ कोटी ७५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

मंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या माध्यमातून आरेतील आदिवासींसाठी विशेष आयोजित केलेल्या वॅक्सीन ड्राईव्हच्या कार्यक्रमावेळी याबाबतची घोषणा केली. विविध पाडे तसेच वस्तींपर्यंत जाणारे आरेतील अंतर्गत रस्तेही लवकरच सुस्थितीत करण्यात येणार असल्याचे आश्‍वासनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

गोरेगाव (पूर्व) येथील दिनकर देसाई मार्ग हा पुर्वी आरे प्रशासनाच्या ताब्यात होता. या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहतुक असल्याने हा रस्ता वारंवार नादुरुस्त होवून वाहतूकीसाठी गैरसोयीचा ठरत होता. असे चित्र असतानाही या मार्गावरुन प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून आरे प्रशासन जबरदस्तीने टोल आकारत होते. या विरोधात आमदार रविंद्र वायकर यांनी वेळोवेळी आंदोलनेही केली तसेच विविध आयुधाच्या माध्यमातून विधानसभेत प्रश्‍नही उपस्थित केले होते. या टोलवसुली विरोधात २०१४ रोजी जन आंदोलन करुन टोल बंद करुन हा रस्ता मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्यात आला. त्यानंतर या रस्त्याची डागडुजी करण्याचे काम मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे.

पुर्व व पश्‍चिम उपनगराला जोडणारा हा रस्ता प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरत असल्याने हा मुख्य रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा करण्यात यावा, यासाठी वायकर यांची मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहारही केला. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मा. ना. श्री. आदित्य ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे तसेच त्यांनी बोलविलेल्या बैठकीत हा मुख्य रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा करण्यात यावा, अशी विनंतीही केली. त्यानुसार त्यांची ही रास्त मागणी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मान्य केली. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आरेतील हा ७.२ किलो मीटर लांबीचा हा मुख्य रस्ता (दिनकर देसाई मार्ग) सिमेंट कॉंक्रीटचा करण्यास येणार आहे. लवकर उर्वरीत प्रक्रीया पुर्ण करुन या रस्त्याच्या कामास सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री तसेच पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे  यांनी आरेतील आदिवासींसाठी राबविण्यात आलेल्या विशेष वॅक्सिन ड्राईव्हच्या कार्यक्रमावेळी दिली.

- Advertisement -

दिनकर देसाई मार्ग :

लांबी – ७.२ किलो मीटर, रुंदी – ९ मीटर, मार्गावर बांधण्यात येणार्‍या स्ट्रॉम वॉटर ड्रेनची लांबी. १२०० मीटर.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -