घरCORONA UPDATECovid Efforts: मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल ठरले IACC चे मानकरी

Covid Efforts: मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल ठरले IACC चे मानकरी

Subscribe

मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांना यंदाचा इंडो अमेरिकन चेेंबर ऑफ कॉमर्स अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे. जगभरात पसरलेल्या कोरोना संकटकाळात मुंबईतील कोरोनाची परिस्थिती नेटाने हाताळल्याबाबत इकबाल चहल यांचा हा गौरव करण्यात आला आहे. याबाबत खासदार सुप्रीया सुळे यांनी ट्विटरवर शुभेच्छा देत त्यांना गौरवण्यात आलेल्या ट्रॉफीचा फोटो शेअर केला आहे. शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. कोविड क्रुसर्डस अॅवॉर् २०२० इकबाल चहल यांना बहाल करण्यात आला आहे. या ऑनलाईन कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारीदेखील उपस्थित होते.

- Advertisement -

जगासह देशालाही कोरोनाच्या विषाणुने विळखा घातला असताना भारतात महाराष्ट्रामध्ये सुरुवातीपासूनच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढून लागली. ही रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने राज्य सरकारच्या सोबत मिळून विविध उपक्रम अंमलात आणले. दरम्यान, मुंबईची स्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून मुंबई महापालिका आयुक्त यांची बदली देखील करण्यात आली. आयएएस अधिकारी इकबाल चहल यांची कोरोना संकटकाळात नियुक्ती करण्यात आली. इकबाल चहल हे पालिका आयुक्तपदी आले तेव्हा मुंबईची स्थिती बिकट होती. धारावी, माटुंगा, वरळी परिसरात कोरोना रुग्णांचा आकडा तिप्पटीने वाढत होता. दरम्यान, चहल यांनी महापालिकेची सूत्र हाती घेताच ऑन फिल्ड उतरून काम करण्यास सुरुवात केली. धारावी, कुरार व्हिलेज सारख्या परिसरात ते फिरले. तसेच कोरोना सेंटर्समध्ये जाऊन त्यांनी रुग्णांनी आरोग्य तज्ज्ञांची भेटही घेतली. अजूनही त्यांच्या कामाचा सपाटा सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नाने मुंबईतील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असून कोरोना संसर्ग होण्याचे प्रणाम कमी झाल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा –

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक : शासनाच्या घोषणा पत्रकांची होळी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -