घरताज्या घडामोडी‘करोना’ व्हायरसचा मुंबई पालिका नगरसेवकांना 'असा'ही फटका!

‘करोना’ व्हायरसचा मुंबई पालिका नगरसेवकांना ‘असा’ही फटका!

Subscribe

मुंबईत करोना व्हायरसचे ३ संशयित रुग्ण आढळले असून या व्हायरसचा फटका मुंबई महानगर पालिकेच्या नगरसेवकांना देखील बसला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलेल्या करोना व्हायरसचे दोन रुग्ण मुंबईत आढळल्यामुळे मुंबईकरांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, करोना व्हायरसचा फटका मुंबई महानगर पालिकेच्या नगरसेवकांना देखील बसला आहे. मुंबई महापालिकेतील सर्व विशेष समिती तसेच सुधार समितीचे अभ्यास दौरे येत्या काही दिवसांमध्ये आयोजित करण्यात आले असून आरोग्य समिती सदस्यांसह महापौर, सभागृहनेते तसेच इतर नगरसेवक आणि अधिकारीही चायनाच्या अभ्यास दौर्‍याला पुढील महिन्यात जाणार आहेत. मात्र, चीनमध्ये ‘करोना’ संसर्गजन्य आजारांची लागण झाल्याने त्याचे लोण आता भारतात तथा मुंबईतही पसरू लागले आहे. त्यामुळे महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांचा हा चीनचा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे.

स्व-खर्चाने निघाले नगरसेवक दौऱ्यावर!

वृक्ष प्राधिकरणाचा सदस्यांचा अभ्यास दौरा सिंगापूरला तर आरोग्य समिती सदस्यांसाठी चीनचा दौरा आयोजित करण्यात येत आहे. याशिवाय सुधार समितीचा दौरा बंगळुरू-उटी-म्हैसूर, शिक्षण समितीचा देहरादून आणि महिला व बाल कल्याण समितीचा दौरा केरळ आणि स्थापत्य शहर समितीचा दौरा अंदमान निकोबारला आयोजित करण्यात येत आहे. मात्र, आरोग्य समिती ही विशेष समिती असल्याने त्यांना देशाच्या बाहेर अभ्यास दौरा केल्यास त्याचा खर्च महापालिकेला करता येत नाही. त्यामुळे आरोग्य समिती अध्यक्ष व सदस्यांसह महापौर आणि सभागृहनेते तसेच नगरसेवकांचा चीन दौरा जवळपास निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये नगरसेवक स्वखर्चाने चीनला जाणार आहेत. यासाठी प्रत्येकी ७० ते ७५ हजार रुपयांचा खर्च आहे. यासाठी आतापर्यंत काही अध्यक्षांसह तब्बल सात ते आठ नगरसेवकांनी आपले पैसे आरोग्य समिती अध्यक्षांकडे जमा केले असल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर, सभागृहनेत्या विशाखा राऊत यांच्यासह विविध विशेष समित्यांचे अध्यक्ष व नगरसेवकांचा हा चीन दौरा निश्चित झाला आहे.

- Advertisement -

वाचा सविस्तर – मुंबईत करोना व्हायरसचे ३ संशयित रुग्ण, पुण्यात २ रुग्ण

मुंबईत ‘करोना’चे ३ संशयित

मात्र, अचानक चीनमध्ये ‘करोना’ हा संसर्गजन्य आजार पसरल्याने मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत चीनमध्ये या संसर्गामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे, तर ४५ लोकांना याची लागण झाली आहे. तर चीनमधून भारतात आलेल्या तीन संशयित रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या आजाराची गंभीरता लक्षात घेता, त्या ठिकाणी सध्या काही महिने जाणे धोक्याचे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महापालिकेतील नगरसेवकांवर हा प्रस्तावित चीन दौरा रद्द करण्याची नामुष्की आली आहे. हा दौरा स्व:खर्चाने असला तरी आरोग्याचा विचार करता तूर्तास चीनचा हा दौरा रद्द करण्याचा विचार असल्याचे नगरसेवकांकडून समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -