घरमुंबईBMC : शौचालय पुनर्बांधणीच्या कामात कुचराई; पालिका कंत्राटदारांना टाकणार काळ्या यादीत 

BMC : शौचालय पुनर्बांधणीच्या कामात कुचराई; पालिका कंत्राटदारांना टाकणार काळ्या यादीत 

Subscribe

मुंबई : सार्वजनिक शौचालयांच्या पुनर्बांधणीच्या कामात कुचराई करणाऱ्या आणि काम मुदतीत पूर्ण न करता ते काम रखडविणाऱ्या कंत्राटदारांना यापुढे काळ्या यादीमध्ये टाकण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. (BMC Cuchrai in toilet reconstruction work The municipality will blacklist the contractors)

मुंबईतील स्वछता, कचरा समस्या, शौचालय कामे, बेकायदा वाहन पार्किंग यांबाबत महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी गुरुवारी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शौचालयांची कामे रखडविणाऱ्या आणि त्यामुळे नागरिकांची गैरसोय करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले. त्यामुळे कडक कारवाईच्या भितीने आता शौचालयांची रखडलेली कामे लवकरच मार्गी लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Pravin Darekar : रोहित पवारांना सुनावताना दरेकरांनी केला ‘काका’चा उल्लेख; नेमका रोख कोणाकडे?

मुंबई महापालिका शौचालय दुरुस्ती अथवा शौचालय पुनर्बांधणीचे कामे टेंडर काढून ऑनलाइन टेंडर प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्या कंत्राटदारांच देते. सदर कामे पालिकेने ठरवून दिलेल्या मुदतीत पार पाडण्याची तयारी दर्शविणाऱ्या इच्छुक कंत्राटदारांनाच नियम ठरवून सदर ऑनलाइन टेंडर प्रक्रियेद्वारे पात्र ठरल्यावर दिली जातात. मात्र कामांबाबत घालून दिलेल्या मुदतीत शौचालयांची कामे पूर्ण न केल्यास नागरीकांची मोठी गैरसोय होताना दिसते. मुंबईत अनेक ठिकाणी शौचालय दुरुस्ती व पुनर्बांधणीची कामे रखडली आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत स्वछता कामांचा आढावा घेतल्यावर शौचालयांची कामे काही ना काही कारणास्तव रखडल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांना स्वछता कामांबरोबरच शौचालयांची रखडलेली कामे, त्यांची कारणे यांचा आढावा घेऊन ती कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेशीत केले होते.

हेही वाचा – Fadnavis Letter Bomb : नवाब मलिक यांना महायुतीत घेऊ नका…..देवेंद्र फडणवीस यांचे अजित पवार यांना पत्र

त्यानुसार आयुक्त चहल यांनी आजच्या बैठकीत शौचालयांची कामे मार्गी लावण्यासाठी बेजबाबदार , दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले. या बैठकीला, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांच्‍यासह सर्व संबंधित परिमंडळांचे सह आयुक्त, उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -