घरCORONA UPDATECoronaVirus : आता दादरमधील घाऊक बाजार पूर्णपणेच बंद

CoronaVirus : आता दादरमधील घाऊक बाजार पूर्णपणेच बंद

Subscribe

लोकांची वाढती गर्दी पाहून महापालिका हतबळ झाली.

दादर पश्चिम येथील सेनापती बापट मार्गावर भरल्या जाणाऱ्या घाऊक भाजी मार्केटचे विकेंद्रीकरण केल्यानंतरही येथील वाढत्या गर्दीपुढे महापालिकेचे अधिकारी आणि पोलिस यांनी पुरते हात टेकले आहे. शहर विभागासाठी याठिकाणी घाऊक बाजाराची व्यवस्था करून उपनगरातील लोकांसाठी स्वतंत्र व्यवस्था केल्यानंतरही ही गर्दी कमी होत नसल्याने सेनापती बापट मार्गावरील घाऊक बाजार आता पूर्णपणेच बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

महापालिका हतबल

दादर येथील घाऊक भाजीपाला मार्केटमध्ये दरदिवशी राज्याच्या विविध जिल्ह्यामधून घाऊक विक्रीसाठी येत असतात. दरदिवशी राज्यातील अनेक भागांमधून मुंबईतील या दादर भागांमध्ये भाजीचे २०० ट्रक येतात. तसेच छोट्या, मोठ्या वाहनांमधून १ हजार भाजी विक्रेते याठिकाणी येत असल्याने याठिकाणच्या गर्दीचे प्रमाण नियंत्रण विविध उपाययोजना करूनही ही गर्दी कमी करण्यात महापालिका आणि पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे हतबल ठरलेल्या महापालिकेने हे भाजी मार्केट तात्पुरत्या स्वरुपात बंद करून त्याचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.

- Advertisement -

जवळच्या जवळ भाजी खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली

दादरच्या हे घाऊक बाजाराचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतानाच महापालिकेने या भाजी मार्केटसाठी सोमय्या मैदान, वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान, मुलुंड जकात नाका, दहिसर जकात नाका आदी ठिकाणी या शेतकऱ्यांसाठी भाजी मार्केट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दोन दिवसांपासून उपनगरांमध्ये ठराविक भागातील भाजी विक्रेत्यांना जवळच्या जवळ भाजी खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तर शहर भागातील लोकांसाठी दादरमधील सेनापती बापट मार्गावरील प्रमोद महाजन उद्यानजवळील परिसरात बाजार सुरू ठेवला होता.

येथील गर्दी कायमच असल्यामुळे…

परंतु दादर रेल्वे स्टेशन (प) सेनापती बापट मार्ग, प्रमोद महाजन उद्यानजवळ अनेक शेतकऱ्यांना उपनगरांमध्ये जागा उपलब्ध करून दिल्यानंतरही दादरमधील गर्दी काही कमी होताना दिसत नाही. येथील गर्दी कायमच असल्यामुळे कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्याच्या उद्देशाने आणि गर्दी कमी करण्यासाठी दादर येथील सेनापती बापट मार्गावरील घाऊक बाजार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे. तसेच सोमय्या मैदान, एमएमआरडीए एक्सबिशन मैदान, मुलुंड जकात नाका, दहिसर जकात नाका येथील घाऊक बाजार सुरुच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

ठिकाण : सोमय्या मैदान
भाजीपाला घेऊन येणारी वाहने : पुणे आणि नाशिक
भाजीपाला विकत घेणारे व्यापारी : घाटकोपर ते माटुंगा

ठिकाण : एमएमआरडीए मैदान, बीकेसी
भाजीपाला घेऊन येणारी वाहने : पुणे आणि नाशिक
भाजीपाला विकत घेणारे व्यापारी : वांद्रे ते गोरेगाव

ठिकाण : मुलुंड जकात
भाजीपाला घेऊन येणारी वाहने : पुणे आणि नाशिक
भाजीपाला विकत घेणारे व्यापारी : मुलुंड ते घाटकोपर

ठिकाण : दहिसर जकात नाका
भाजीपाला घेऊन येणारी वाहने : वसई, विरार
भाजीपाला विकत घेणारे व्यापारी: दहिसर ते मालाड


हेही वाचा – मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कामगारांच्या वाहनांवरच कारवाई


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -