घरताज्या घडामोडीमुंबईकरांच्या मिनी नाईटलाईफसाठी पुनश्च हरिओम, विकेंडसाठी लागू असणार 'हे' वेळापत्रक

मुंबईकरांच्या मिनी नाईटलाईफसाठी पुनश्च हरिओम, विकेंडसाठी लागू असणार ‘हे’ वेळापत्रक

Subscribe

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडून परिपत्रक जारी

मुंबईतील दुकानांना, वाईन्स शॉप्स, उपहारगृह, बारसाठीचे नवीन वेळापत्रक मुंबई महापालिकेने जाहीर केले आहे. प्रत्येक आठवड्याच्या फक्त विकेंडसाठीच हे वेळापत्रक लागू असेल. पण या वेळापत्रकाच्या निमित्ताने पर्यावरणमंत्री आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना दिलेला शब्द खरा केला आहे. आदित्य ठाकरे यांनी नुकतेच मुंबईच्या नाईट लाईफवर एक आश्वासन मुंबईकरांना दिले होते. मुंबई महापालिकेच्या या वेळापत्रकाच्या निमित्ताने कोरोना काळात आलेल्या अनेक मर्यादांमध्ये शिथीलता यायला सुरूवात झाली आहे. मिशन बिगिनमध्ये अनेक गोष्टी पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या. मुंबई महापालिकेने जाहीर केलेले वेळापत्रक त्याचाच एक भाग आहे. मुंबईत नाईट लाईफची सुरूवात २६ जानेवारी २०२० रोजी सुरू करण्यात आली होती. पण कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे या नाईट लाईफच्या सवलतीवर बंधने आली होती.

कशी असेल विकेंडची नाईट लाईफ ?

मुंबईतील दुकाने – रात्री ११ वाजेपर्यंत
वाईन शॉप्स – १०.३० वाजेपर्यंत
उपहारगृहे – १ वाजेपर्यंत
बार – १ वाजेपर्यंत
(प्रतिबंधित क्षेत्रातील व्यवसायांना पूर्वीचेच नियम लागू राहतील.)

- Advertisement -

BMC

मुंबई महापालिकेने शनिवारपासून या वेळांबाबतचे महत्वाचे असे पत्रक जारी केले आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी याबाबतचे एक परिपत्रक आज जारी केले. आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार आहे. मुंबई शहरासाठी राज्य शासनाने दिलेल्या आदेशान्वये मिशन बिगिन अगेन सुरूच राहील असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसारच या वेळांची निश्चिती करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -