घरCORONA UPDATECorona: मुंबईत होणार लाखो कोरोनाबाधित; पालिकेने म्हटले माहिती दिशाभूल करणारी

Corona: मुंबईत होणार लाखो कोरोनाबाधित; पालिकेने म्हटले माहिती दिशाभूल करणारी

Subscribe

केंद्रीय पथकाच्या मुंबईतील पाहणी दौऱ्यानंतर शहरात कोरोना रुग्णांची संख्या लाखोंवर जाणार असल्याची बातमी बुधवार प्रसार माध्यमातून येऊ लागली.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित आहेत. शिवाय महाराष्ट्रातही देशात इतर राज्यांपेक्षा कोरोना रुग्णांचा आकडा जास्त आहे. याची गंभीर दखल घेत केंद्राने विशेष पथक राज्यात किंबहुना मुंबईत पाठवले. या पथकाने मुंबईतील हॉटस्पॉट असलेल्या विभागांची पाहणी केली. त्यानंतर मुंबईमध्ये ३० एप्रिलपर्यंत ४२ हजार तर १५ मेपर्यंत ३ लाख कोरोना रुग्णांचा आकडा जाण्याची शक्यता असल्याचे मत केंद्रीय पथकाने व्यक्त केल्याची माहिती समोर येऊ लागली. मात्र मुंबई महापालिकेने ही माहिती बिनबुडाची असल्याचे म्हणतं हे लोकांना दिशाभूल करण्यासारखे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या माहितीला नकार देत मुंबईत अशी कोणतीही परिस्थिती उद्भवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पालिकेने दिले लेखी स्पष्टीकरण 

केंद्रीय पथकाच्या मुंबईतील पाहणी दौऱ्यानंतर शहरात कोरोना रुग्णांची संख्या लाखोंवर जाणार असल्याची बातमी बुधवार प्रसार माध्यमातून येऊ लागली. मात्र यावर मुंबई महापालिकेने लेखी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी त्यात नमूद केले आहे की, केंद्रीय पथकाने आपल्या अभ्यास दौऱ्यादरम्यान पालिका आयुक्तांसह पालिकेतील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. तसेच पालिका करत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. या पथकाने पालिका प्रशासनाद्वारे राबवण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक आणि वैद्यकीय उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केलेले आहे.

- Advertisement -

राज्यातील सद्यपरिस्थिती 

दरम्यान, देशभरात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आज १ हजार ४८६ रुग्णांची वाढ झाली आहे. तर एकूण रुग्णसंख्या २० हजार ४७१ वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत ६५२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात ४३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५ हजार ६४९ झाली आहे. यात १८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून ६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मृत्यू झालेल्यांपैकी मुंबई १०, पुणे २, औरंगाबाद २ तर कल्याण डोंबिवली १, सोलापूर मनपा १, जळगाव १ आणि मालेगाव एक, अशी आकडेवारी आहे.

हेही वाचा –

Coronavirus Mumbai: वर्सोवा कोळीवाड्यात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -