घरCORONA UPDATEमुंबई महापालिकेतील अभियांत्रिकी विभागाच्या उपायुक्तांचा कोरोनामुळे मृत्यू!

मुंबई महापालिकेतील अभियांत्रिकी विभागाच्या उपायुक्तांचा कोरोनामुळे मृत्यू!

Subscribe

नुकतीच मुंबईतल्या यशोधन या प्रशासनातल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचं निवासस्थान असलेल्या इमारतीमध्ये २८ कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याचा प्रकार समोर आला असतानाच एक दु:खद वृत्त समोर आलं आहे. मुंबई महानगर पालिकेमध्ये उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे राहत्या घरी मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी होती. पाणी पुरवठा प्रकल्प विभागाचे प्रमुख अभियंता आणि अभियांत्रिकी विभागाचे प्रभारी उपायुक्त म्हणून ते महापालिकेमध्ये कार्यरत होते. या प्रकारामुळे मुंबई महानगर पालिकेतले अभियंते आणि कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचं वातावरण पसरलेलं असून आपली कोरोना चाचणी करण्यात यावी, अशी मागणी या कर्मचारी आणि अभियंत्यांकडून करण्यात येत आहे.


हेही वाचा – सनदी अधिकाऱ्यांच्या ‘यशोधन’ इमारतीत खळबळ; २८ कोरोना पॉझिटिव्ह!

मुंबईच्या चर्चगेट परिसरात असलेल्या यशोधनमध्ये सोमवारी तब्बल २८ कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यामुळे मुंबईच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यामध्ये काही अधिकारी आणि त्यांच्या चालक-घरकामगारांचा समावेश आहे. त्यामुळे आता या इमारतीत राहणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -