मुंबईत मागच्या काही तासांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे कधी नव्हे ते दक्षिण मुबंईतील रस्ते पाण्याखाली गेलेले पाहायला मिळाले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १०० मिमीपेक्षाही जास्त पाऊस पडल्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच जे.जे. रुग्णालयात पाणी साचले होते. रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी तुंबलेल्या पाण्यात वावरतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनानंतर ई विभागाने Action मोडवर काम करुन केवळ तीन तासांत संपुर्ण पाणी बाहेर काढून जे.जे.रुग्णालय कोरडे केले आहे.
जे. जे. रुग्णालयातील पाण्याचा निचरा करण्यात आला असून तेथे आता पाणी साचलेले नाही, हे दर्शविणारी छायाचित्रे. ई विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी जेजे रुग्णालयात व्यक्तिश: भेट दिली असून विभाग कार्यालयाची यंत्रणा देखील पाणी उपसा करणाऱ्या संयंत्रांसह हजर आहे.#MyBMCUpdates pic.twitter.com/NMJEcmZe90
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 5, 2020
जे.जे. रुग्णालयात संध्याकाळच्या दरम्यान पाणी तुंबण्यास सुरुवात झाली होती. काहीच वेळात त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांत महानगरपालिकेने रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवून रुग्णालयाचा ताबा घेतला होता. ई विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी जेजे रुग्णालयात व्यक्तिश: भेट दिली. महानगरपालिकेची यंत्रणा देखील पाणी उपसा करणाऱ्या संयंत्रांसह हजर असल्याचे सांगण्यात येत आहे.
JJ Hospital, Maharashtra's largest and one of Western India's busiest… Today!Very symbolic of the state of healthcare in India… When basics like drainage are left Ram Bharose literally while we dream of cutting-edge healthcare! pic.twitter.com/SGsEy6LaHH
— Yogesh Leela Pawar (@powerofyogesh) August 5, 2020
Ground floor casualty ward of JJ Hospital, Mumbai #MumbaiRains pic.twitter.com/MUwQO7tFk5
— Riyal shaikh (@Riyalshaikh) August 5, 2020
पाणी तुंबल्याचे व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर आता नेटीझन्सकडून महानगरपालिकेचे कौतुक देखील होत आहे. अनेकांनी पाणी काढल्यानंतरचे फोटो ट्विट करुन महानगरपालिकेच्या कामाची प्रशंसा केली आहे.
#Great_Work @mybmc : There is no water accumulated right now at JJ Hospital. E ward Assistant Commissioner personally visited the JJ hospital. Ward team along with the suction machine is present and dewatering pump will be shifted within 2 hrs for future precautions. (BMCPRO) pic.twitter.com/wpIAUXvv9d
— Santosh Andhale (@Santosh_Andhale) August 5, 2020
Water had entered JJ Hospital in the evening due to incessant rainfall. It was later cleared and currently, there is no water accumulation: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #Maharashtra https://t.co/rC4DKrcvO7 pic.twitter.com/kIYBv6Bzj1
— ANI (@ANI) August 5, 2020