BMC Election: पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपचा ‘मराठी कट्टा’

mumbai corona covid 19 vaccination benefits in genome sequencing delta variant in mumbai almost

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली असून शिवसेनेला पराभूत करण्यासाठी नवी नवी व्यूहरचना तयार केली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबई भाजपनं नवी संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून मुंबईत ‘मराठी कट्टा’ ही नवी संकल्पना राबवण्यात येणार आहे.

भाजप १ ऑक्टोबरपासून ‘मराठी कट्टा’ संकल्पनेला सुरुवात होणार आहे. आमदार नितेश राणे आणि सुनील राणे यांच्याकडे ‘मराठी कट्टा’ आयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. चेंबूर घाटला व्हिलेज येथे पहिला ‘मराठी कट्टा’ आयोजित होणार आहे. मराठी मुद्दा, मराठी भाषिकांच्या समस्या तसंच सत्ताधारी शिवसेनेने मराठी माणसावर केलेला अन्यायावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न मुंबई भाजप या संकल्पनेतून करणार आहे.

पालिकेवर शिवसेनेचीच सत्ता येणार – अनिल परब

भाजपच्या मुंबई कट्टा या कार्यक्रमावर परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अॅड. अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली. ‘प्रत्येकाला निवडणूक जिंकण्यासाठी जे मार्ग अबलंबवायचे आहेत ती त्या पक्षाची मोकळीक असते. मुंबई महापालिका कित्येक वर्ष शिवसेनेच्या ताब्यात आहे. आम्ही लोकांच्या समोर आमची कामे घेऊन जाऊ. लोकांचा विश्वास आहे महापालिका शिवसेनेच्या हातात सुरक्षित आहे आणि भविष्यात पण ते शिवसेनेच्या हातात देतील, असा दावा अनिल परब यांनी केला आहे. तसंच, कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही इतके वर्ष मुंबईकरांचा विश्वास जिंकला आहे तसाच या पुढेही तो जिंकू, असं अनिल परब म्हणाले.