घरमुंबईदिवाळीच्या सुट्टीत अतिक्रमण, मनपाचा हातोडा

दिवाळीच्या सुट्टीत अतिक्रमण, मनपाचा हातोडा

Subscribe

दिवाळीच्या सुट्टीचा गैरफायदा घेऊन मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणं झाली. पण, दिवाळी संपताच पालिकेनं त्यावर हातोडा चालवण्याचं काम हाती घेतलं आहे. दिवाळीनंतर वांद्रे येथे पालिकेच्या ३५ हजार चौरस फुटावर झालेली अतिक्रमणं पालिकेच्या पथकानं मंगळवारी जमीनदोस्त केली.

मुंबई शहरात सध्या अतिक्रमाणांच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. न्यायालयानं देखील यामध्ये लक्ष्य घातले आहे. शिवाय आता वाढत्या अतिक्रमणांविरोधात मनपा देखील आक्रमक झालेली पाहायाला मिळत आहे. ज्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे त्यावर हातोडा चालवण्याचं काम देखील मनपा करताना दिसत आहे. पण, त्यानंतर देखील अतिक्रमाणांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिवाळीच्या सुट्टीचा गैरफायदा घेऊन मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणं झाली. पण, दिवाळी संपताच पालिकेनं त्यावर हातोडा चालवण्याचं काम हाती घेतलं आहे. दिवाळीनंतर वांद्रे येथे पालिकेच्या ३५ हजार चौरस फुटावर झालेली अतिक्रमणं पालिकेच्या पथकानं मंगळवारी जमीनदोस्त केली. दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये अतिक्रमाणांच्या प्रकरणांमध्ये वाढ होते. पण, सुट्टीमुळे पालिकेला कारवाई करणं शक्य होत नाही. त्याचा फायदा उचलत वांद्रेतील स्वामी विवेकानंद मार्गालगत कुरेशी नगरमध्ये म्हाडाच्या जवळपास ३५ हजार चौरस फुट भूखंडावर २५० झोपड्या बांधल्या गेल्या होत्या. ९ नोव्हेंबरला ज्यावेळी परिसरामध्ये झोपडपट्टीला आग लागली तेव्हा अग्निशमन दलाला या झोपडपट्यांमुळे अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर ही बाब पालिकेनं गांभीर्यानं घेतली. यावर पालिका थांबली नाही तर पालिकेनं उपायुक्त आनंद वागराळकर यांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करत २५० झोपडपट्या जमीनदोस्त केल्या.

मुंबईला अतिक्रमणांचा विळखा

मुंबईत सध्या अतिक्रमणांचा विळखा पडल्याचं दिसत आहे. दिवसेंदिवस मुंबईत येणारे लोंढे वाढले असून मिळेल त्या ठिकाणी झोपडं बांधलं जात आहे. काही ठिकाणी तर पालिका अधिकाऱ्यांशी साटंलोट करून अतिक्रमण केलं जात आहे. त्यामुळे सरकार किंवा पालिकेच्या जागेवर अतिक्रमणात वाढ होताना दिसत आहे. पालिका देखील आता अतिक्रमण झालेल्या ठिकाणी कारवाई करताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -