घरताज्या घडामोडीपालीकरांना मोठा दिलासा; पाली जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती थांबवली

पालीकरांना मोठा दिलासा; पाली जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती थांबवली

Subscribe

पाली जलाशयाच्या बांद्रा रेक्लेमेशन इनलेटवर मेहबूब स्टुडिओ येथे ६०० मि.मि. व्यासाच्या जलवाहिनीची मोठी गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जात होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी.वेलरासू यांच्या आदेशान्वे जल अभियंता विभागाच्या सहाय्यक अभियंता जल कामे (तातडीचा दुरुस्ती विभाग) वरळी यांनी सहाय्यक अभियंता जल कामे -परिमंडळ (प.उ.-द.) यांच्या मार्गदर्शनानुसार दुरुस्ती कामास तातडीने सुरूवात सुरू केली.

जल पुरवठ्याचे पाणी सर्वच बाजूने येत असल्याने आणि काँक्रीट रोड असल्यामुळे गळती शोधणे अवघड जात होते. गळती शोधक पथकाने आधुनिक यंत्राच्या सहाय्याने जमिनीखालील १२ फूट खोल गळती अचूकपणे शोधली. दुरुस्ती विभागाने जेसीबीचा वापर करून खोदाईचे काम हाती घेतले. या ठिकाणी महानगर टेलिफोन, टाटा, रिलायन्स, अडाणी, महानगर गॅस आदी कंपन्यांच्या उच्च दाबाच्या केबल्सचे जाळे पसरलेले आहे. त्यातून अत्यंत काळजीपूर्वक खोदाईचे काम पालिकेचा जल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले. कारण गळतीचे पाणी या केबल्सच्या चेंबरमध्ये जात होते. धोका टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांना विश्वासात घेऊन आवश्यक ती पूर्ण खबरदारी घेऊन या केबल्स काही ठिकाणी कापाव्या लागल्या तर काही ठिकाणी बंद कराव्या लागल्या.

- Advertisement -

दसरा सण असताना कोणत्याही प्रकारे पाणी पुरवठा खंडित न होता, वाहतूक सुरळीत ठेवून हे काम १८ तास कुठल्याही खंडाशिवाय पूर्ण करण्यात आले. परिसरातील आणि इमारतीमधील नागरिकांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याचीही तसदी घेण्यात आली होती. प्रभावित जलवाहिनी सापडल्यावर आणि निरीक्षण केल्यावर तिच्या तळाला दोन ठिकाणी मोठी गळती निदर्शनास आली. अत्यंत कुशलतेने त्या ठिकाणी प्रथम लाकडी खुट्या ठोकल्या. त्यानंतर एम.एस.पॅच वेल्डिंग आणि टेलपीस लावून गळती पूर्णपणे बंद केली.

जल अभियंता (प्रभारी) संजय आर्ते, उप जल अभियंता राजेश ताम्हाणे, कार्यकारी अभियंता सुशील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता जल कामे (ता.दु.वि.) वरळी जीवन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तेजस, सहाय्यक अभियंता रमेश कुऱ्हाडे, सहाय्यक अभियंता, अमित हटवार, डोनाल्ड, वैभव गावडे यांच्या मदतीने हे अत्यंत गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक काम पूर्ण करण्यात आले. सहाय्यक अभियंता जल कामे (ता .दु . वि ) वरळी विभागातील कामगार वर्गाने विशेष मेहनत घेऊन कमीतकमी वेळेत हे आव्हानात्मक काम पार पाडले .

- Advertisement -

पाली हिल परिसरातील आणि एच/पश्चिम विभागातील पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत केल्या बद्दल अधिकारी वर्ग आणि परिसरातील नागरिकांकडून जल अभियंता विभागातील कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.


हेही वाचा – delta variant : जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये लसीकरण फायदेशीर, मुंबईत डेल्टा व्हेरीयंटचा धोका टळला


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -