Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona: कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलेविरोधात पालिकेकडून गुन्हा दाखल

Corona: कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलेविरोधात पालिकेकडून गुन्हा दाखल

पवई येथील एव्हरेस्ट हाईट्स सोसायटीत कोरोना रुग्ण आढळला. मजला सील केल्यानंतरही महिला रहिवाशी, मोलकरणीची भटकंती

Related Story

- Advertisement -

राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने लॉकडाऊनमध्ये दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेणाऱ्या काही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे मुंबईत गेल्या १ फेब्रुवारीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येतही काहीशी वाढ झाली आहे. आता पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी कडक कारवाईचे आणि थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

पवई येथील एव्हरेस्ट हाईट्स या इमारतीमध्ये एक रहिवाशी कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आल्याने पालिकेने या इमारतीमधील संपूर्ण मजला सील केला आणि रहिवाशांना बाहेर जाण्यास मनाई केली. मात्र तरीही कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करून बाहेर भटकंती करणाऱ्या एका महिलेच्या विरोधात पालिकेने पवई पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. त्यामुळे परिसरात काहीशी खळबळ उडाली आहे. कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सोसायट्या या पालिकेच्या रडारवर आल्या आहेत.

- Advertisement -

पालिका प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, पवई, चांदीवली येथील एव्हरेस्ट हाईट्स या इमारतीमधील फ्लॅट क्रमांक १७०१/१७०२ मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे एसआरएल डायग्नोस्टिक लॅबच्या वैद्यकीय अहवालानुसार समोर आले आहे. त्यामुळे पालिका आरोग्य यंत्रणेने या सोसायटीमधील रुग्ण आढळून आलेल्या १७ व्या मजल्याला सील करून टाकले. तसेच, या मजल्यावरील रहिवाशांनी इमारतीबाहेर ये-जा करू नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली होती. त्याच प्रमाणे सदर सोसायटीच्या बाहेर पालिकेने यासंदर्भातील माहितीपर फलकही लावला आहे. मात्र तरीही याच मजल्यावर फ्लॅट क्रमांक १७०३/१७०४ यामध्ये राहणाऱ्या कामिया वर्मा या १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी दोन दिवस फ्लॅटबाहेर म्हणजे इमारतीच्या बाहेर गेल्याचे पालिकेचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण महांगडे यांना आढळून आले. तसेच या महिलेच्या घरातील मोलकरीण त्यांच्या पाळीव कुत्र्याला घेऊन इमारतीबाहेर ये-जा करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे डॉ. महांगाडे यांनी वरिष्ठांच्या आदेशाने गंभीर दखल घेऊन पवई पोलीस ठाण्यात सदर महिलेच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.


हेही वाचा – वादळी वाऱ्यामुळे हार्बर लाईन विस्कळीत


- Advertisement -

 

- Advertisement -