घरमुंबईवाडियाला दिलेल्या १३ कोटींचे श्रेय कुणाचे?

वाडियाला दिलेल्या १३ कोटींचे श्रेय कुणाचे?

Subscribe

वाडिया रुग्णालयाला १३ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिल्यानंतर आता श्रेयाची लढाई सुरु झाली असून याचे श्रेय प्रत्येक जण घेताना दिसत आहेत.

वाडिया रुग्णालयाला १३ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिल्यानंतर आता श्रेयाची लढाई सुरु आहे. वाडियाला १३ कोटी रुपयांचा निधी आपण मिळवून दिला असल्याची घोषणा महापौर किशोरी पेडणेकर करत असल्या तरी महापौरांनी बैठक घेण्यापूर्वीच ही रक्कम देण्याचा निर्णय झाला होता. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ही आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सर्व प्रकारचा प्रयत्न केला होता. परंतु पेडणेकर यांनी याचे श्रेय आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी यासाठी आपण प्रयत्न केल्याचा दावा भाजपच्या नगरसेविका राजेश्री शिरवाडकर यांनी केल्याने नक्की प्रयत्न कुणाचे आणि श्रेय कोण घेते याचीच चर्चा सुरु आहे.

प्रयत्न माजी महापौर आणि भाजप नगरसेविकेचे आणि श्रेय घेतात आजी महापौर

परळ येथील वाडिया रुग्णालयाला मागील तीन वर्षांपासून महापालिका प्रशासन अनुदान देत नसल्याने हे रुग्णालय बंद करण्याच्या मानसिकतेत प्रशासन आहे. हे रुग्णालय बंद करण्याचा घाट प्रशासनाने घातला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ५ डिसेंबर रोजीच्या स्थायी समितीच्या सभेत करत या मुद्दयाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आमदार अजय चौधरी, माजी महापौर श्रध्दा जाधव यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर वाडियाला १३ कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली. परंतु, स्थायी समितीमध्ये हा मुद्दा येण्यापूर्वीच माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ४ डिसेंबर रोजी तत्कालिन अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांची यावर स्वाक्षरी घेऊन, आयुक्त प्रविणसिंह यांच्या कार्यालयात जाऊन या निधी देण्याबाबतही स्वाक्षरी घेतली होती. त्यामुळे महापौर पेडणेकर यांनी बैठक घेण्यापूर्वीच माजी महापौरांनी हा निधी मिळवून देण्यासाठीची सर्वप्रकारची औपचारिकता पूर्ण केलेली होती. मात्र, त्यानंतर केवळ बैठकीचा फार्स करून याचे श्रेय आमदार आणि महापौरांनी आपल्या झोळी पाडून घेण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

मात्र, महापौर केवळ वाडियाला १३ कोटी रुपये दिल्याचे श्रेय घेत असले तरी यासाठी आपण अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांची भेट घेऊन त्यांना ही रक्कम देण्याची विनंती केली होती. यापूर्वी शिवसेनेच्या नगरसेवकांच्या मागणीबाबत जोशी यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता. पण आपण विनंती केल्यानंतर त्यांनी यावर स्वाक्षरी करण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे ही रक्कम देण्यासाठी आपण प्रयत्न केला असल्याचे भाजप नगरसेविका राजेश्री शिरवाडकर यांनी स्पष्ट केले. परंतु, ही मदत तात्पुरती असून महापौरांनी न केलेल्या कामांचे श्रेय घेण्यापेक्षा वाडियाची जी थकबाकी प्रलंबित आहे, ती देण्याचा प्रयत्न करावा. कारण आज जी रक्कम त्यांना दिली आहे, त्यामध्ये एक ते दोन महिन्यांचे पगार सुरळीत होतील. पण पुन्हा पगाराचा प्रश्न अधांतरीच आहे. त्यामुळे महापौरांनी उर्वरीत ८० ते ८२ कोटी रुपयांची रक्कम मिळवून द्यावी. त्यावेळी आम्ही त्यांचे निश्चितच स्वागत करू, असे त्यांनी सांगितले.


हेही वाचा – इजिप्तमध्ये भीषण अपघात; २८ ठार, १६ भारतीय जखमी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -