Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुंबईकरांनो पुढील ७ दिवस महत्त्वाचे -मुंबई पालिकेचा इशारा

मुंबईकरांनो पुढील ७ दिवस महत्त्वाचे -मुंबई पालिकेचा इशारा

यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर मुंबई महापलिकेचे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनीही मुंबईकरांना सावध राहण्याचा सल्ला दिला असून पुढील ७ दिवस महत्वाचे असल्याचे म्हटले आहे.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सावध झाल्या आहेत. डिसेंबर नंतर प्रथमच एकाच दिवसात चार हजार कोरोनाबाधित आढळले. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर मुंबई महापलिकेचे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनीही मुंबईकरांना सावध राहण्याचा सल्ला दिला असून पुढील ७ दिवस महत्वाचे असल्याचे म्हटले आहे.

डिसेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने घट झाली होती. यामुळे सहा महिन्याभरापूर्वी देशात कोरोनाचा हॉटस्पॉट झालेली मुंबई कोरोनाच्या विळख्यातून मुक्त होत असल्याचे चित्र होते. त्याचपार्श्वभूमीवर राज्य सरकारबरोबरच पालिकेनेही काही अटी शर्थींवर निर्बंद्ध शिथिल केले. त्यानंतर फेब्रुवारीपासून सामान्य नागरिकांसाठी लोकलसेवा ठराविक वेळांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. पण नंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे समोर येत आहे.

- Advertisement -

यामुळे राज्य सरकारसह पालिका सतर्क झाली आहे. याचपार्श्वभूमीवर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनीही मुंबईकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. मुंबईत सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण थोडे वाढले आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाली आहेत. सर्व प्रकारच्या वाहतूक व्यवस्था सुरू केल्यानंतर काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढेल, असे आम्ही गृहित धरलेॉ होते. मात्र, आम्ही अपेक्षा केल्या होत्या त्यापेक्षा कमीच रुग्णसंख्या आढळली आहे. तरीही पुढील ७ दिवस महत्त्वाचे आहेत. पुढील ७ दिवसांत रुग्णसंख्या काय असेल, यावर पुढील निर्णय घेतला जाईल, असे काकाणी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -