घरमुंबईखड्डे बुजवण्यासाठी ‘तारीख पे तारीख’

खड्डे बुजवण्यासाठी ‘तारीख पे तारीख’

Subscribe

मंगळवारी महापालिकेने पुन्हा बैठक घेतली आणि ४८ तासांची डेडलाईन देण्यात आली. खड्डे बुजवण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्यामुळे मुंबईकर मात्र हैराण झाले आहेत.

मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा मुहूर्त काही महानगरपालिकेला मिळत नाही. शनिवारी मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे महानगरपालिका बुजवणार होती. मात्र खड्डे बुजवलेच गेले नाहीत. त्यामुळे मंगळवारी महापालिकेने पुन्हा बैठक घेतली आणि ४८ तासांची डेडलाईन देण्यात आली. खड्डे बुजवण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्यामुळे मुंबईकर मात्र हैराण झाले आहेत.

खड्डे बुजवण्यासाठी काल महापालिका मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, रस्ते विभागाचे मुख्य अभियंता विजय चिटोरे, अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते. बैठकीत रस्ते बुजवण्यासाठी पुन्हा ४८ तासांची डेडलाईन देण्याचा निर्णय झाला.

- Advertisement -

मुंबईत ३५८ खड्डे शिल्लक असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यापैकी ९० टक्के खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे. महापालिकेने 48 तासांत खड्डे बुजवण्याच्या वल्गना केल्या होत्या. शनिवारी रात्रीपर्यंत खड्डे बुजवण्यात पालिकेला अपयश आल्याचे चित्र होते. त्यातच आता ४८ तासांची पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

कोणतीही आकडेवारी व कारणे न देता प्रशासनाने 48 तासांत खड्डे बुजवावेत, अशी मागणी नगरसेवकांनी केल्यानंतर प्रशासनाने तसे आश्वासन दिले. 48 तासांत खड्डे बुजवण्यात येतील आणि ते चुकीच्या पद्धतीने बुजवल्यास कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर एफआयआर दाखल करू, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सभागृहात दिले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी पालिकेच्या मुख्यालयात रस्ते विभागाच्या मुख्य अभियंत्यांची कंत्राटदारांसोबत बैठक झाली. त्यावेळी कंत्राटदारांना 48 तासांची मुदत देण्यात आली होती.

- Advertisement -

नागरिकांनीच घेतला पुढाकार

रस्त्यावरील खड्डे जीववर बेतू लागल्यामुळे आता मुंबईकरांनीच ते बुझवण्याचा पुढाकार घेतला आहे. विभागातील मोठ्या खड्ड्यात वाहन अडकून कोणाचा जीव जाऊ नये म्हणून त्यात डेबरीज, पेवर ब्लॉक टाकून ते काहीप्रमाणात बुझवण्याचा प्रयत्न मुंबईकरांनी केला आहे. अनेक ठिकाणीतर मातीही टाकण्यात आली आहे. पालिका खड्डे बुझवत नसल्यामुळे त्यावर मुंबईकरांनी आपल्यापरीने तोडगा काढण्यास सुुरुवात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -