घरताज्या घडामोडीकापडी पिशव्यांच्या वाटपासाठी पावणे तीन कोटींचा निधी

कापडी पिशव्यांच्या वाटपासाठी पावणे तीन कोटींचा निधी

Subscribe

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीत मंजुरी देताना केलेल्या निधींच्या तरतुदींमध्ये तब्बल अडीच कोटी रुपयांच्या कापडी पिशव्यांकरता वर्ग केला आहे. याकरता तब्बल ११ नगरसेवकांनी निधीची तरतूद केली आहे.

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीत मंजुरी देताना केलेल्या निधींच्या तरतुदींमध्ये तब्बल अडीच कोटी रुपयांचा कापडी पिशव्यांकरता वर्ग केला आहे. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आल्याने त्याऐवजी नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यासाठी शिवसेनेनेसह अनेक पक्षांच्या नगरसेवकांनी २ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधींची तरतूद केली आहे. त्यामुळे मागील वर्षी केवळ दोन – तीन नगरसेवकांनीच या कापडी पिशव्यांसाठी पुढाकार घेतला होता. परंतु, यावेळी तब्बल ११ नगरसेवकांनी कापडी पिशव्यांसाठी भरघोस तरतूद केली आहे.

तब्बल ११ नगरसेवकांनी केली निधीची तरतूद

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्लास्टिक बंदी लागू करून येत्या मेपासून या बंदीची अंमलबजावणी करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार सध्या मुंबईत प्लास्टिक बंदीच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. मुंबईत जून २०१८ पासून प्रत्यक्षात प्लास्टिक बंदीच्या कारवाईला सुरुवात झाली असली तरी या मार्चपासून सरसकट सर्वच प्लास्टिकवर कारवाई करण्याचे निर्देश पर्यावरण विभागाने दिले आहे. त्यानुसार नागरिकांकडील प्लास्टिक पिशव्याही जप्त केल्या जात आहे. व्यावसायिकांसह नागरिकांनाही प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्यास बंदी आहे. त्यामुळे याला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर नागरिकांनी करणे आवश्यक आहे. याकरता नागरिकांना कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यासाठी सुधारित अर्थसंकल्पात नगरसेवकांनी भरघोस निधीची तरतूद केली आहे. यामध्ये तब्बल पावणे तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. अकरा नगरसेवकांनी १५ ते ४० लाख रुपयांपर्यंत कापडी पिशव्यांसाठी तरतूद केली आहे. यापूर्वी माजी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर आणि विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ज्यूट पिशव्यांसाठी निधीची तरतूद केली होती. परंतु, अशाप्रकारच्या निधीचा वापर करण्यास मान्यता नसल्याने शासनाच्या मान्यतेने कापडी पिशव्या नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार आता शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर यंदा कापडी पिशव्यांसाठी तरतुद करण्याकरता अनेक नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे.

- Advertisement -
  • प्रभाग क्रमांक १९३ : ३० लाख रुपये
  • प्रभाग क्रमांक १९७ : ३० लाख रुपये
  • प्रभाग क्रमांक ९५ : १० लाख रुपये
  • प्रभाग क्रमांक ०४ : २० लाख रुपये
  • प्रभाग क्रमांक ०५: ४० लाख रुपये
  • प्रभाग क्रमांक ११५ : ३० लाख रुपये
  • प्रभाग क्रमांक १९१ : २५ लाख रुपये
  • प्रभाग क्रमांक १९५: ३० लाख रुपये
  • प्रभाग क्रमांक १९९ : १५ लाख रुपये
  • प्रभाग क्रमांक २०२ : ३० लाख रुपये
  • प्रभाग क्रमांक २१० : १५ लाख रुपये

    हेही वाचा – करोनामुळे चार देशांचे व्हिजा निलंबित


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -