रस्त्यालगतच्या गटारावरील तुटलेल्या झाकणाकडे पालिकेचे दुर्लक्ष

पावसाळा तोंडावर आल्याने महापालिका (BMC) आयुक्त इकबाल चहल यांनी, रस्ते, नालेसफाई, पूल दुरुस्ती, नाल्यावरील झाकणे आदी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत.

पावसाळा तोंडावर आल्याने महापालिका (BMC) आयुक्त इकबाल चहल यांनी, रस्ते, नालेसफाई, पूल दुरुस्ती, नाल्यावरील झाकणे आदी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. मात्र घाटकोपर (प.), सर्वोदय रूग्णालय, बमणजी वाडी येथे गोळीबार रोडलगत असलेल्या गटारावरील झाकण तुटून आज १० दिवस होत आले तरी पालिकेकडून त्यावर उपाययोजना करण्यात आलेली नाही. या तुटलेल्या झाकणाच्या बाजूने गेलेल्या रस्त्यावरील एखाद्या वाहनाला, प्रवाशाला अपघात होण्याची व त्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या गटारावरील झाकण वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे अनेकदा तुटतात. ती झाकणे तुटल्याने तात्काळ बदलणे आवश्यक असते. यापूर्वी सदर ठिकाणी अनेकदा गटारावरील झाकण तुटले त्यावेळी कधी कधी तात्काळ एक – दोन दिवसात तर कधी कधी चार दिवसांनी झाकण बदलून त्या ठिकाणी नवीन झाकण बसविण्यात येते. मात्र यावेळी सदर गटारावरील झाकण तुटल्याबाबत स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या विभाग कार्यालयात तक्रार देऊन कळवले. मात्र गटारावरील तुटलेल्या झाकणाची पाहणी करण्यासाठी पालिकेचे संबंधित अधिकारी, कर्मचारी हे काहीशा उशिराने त्या ठिकाणी आले व ते पाहणी करून परत गेले. मात्र या पाहणी नंतर आणखीन ३ दिवस उलटले तरी तुटलेले झाकण बदलून त्या ठिकाणी नवीन झाकण बसविण्यात आलेले नाही.

झाकणाच्या ठिकाणी झाडाच्या छोट्या छोट्या फांद्या

या तुटलेल्या झाकणाच्या ठिकाणी झाडाच्या छोट्या छोट्या फांद्या लावून त्या भोवती धोका दर्शवणारी रिबीन्स गुंडाळण्यात आली आहे. हे गटार व त्यावरील तुटलेले झाकण हे गोळीबार रोडवर असून या रोडवरून दररोज शेकडो हलकी वाहने, बेस्टची मिनी एसी बस, टेम्पो आदी वाहनांची सतत ये – जा असते. घाटकोपर स्टेशन ते अमृतनगर या मार्गावर दररोज शेअर रिक्षा भरधाव सुरू असते. या रिक्षाचे चाक या गटारावरील तुटलेल्या झाकणाच्या ठिकाणी गेले व त्यात रिक्षा अडकून पलटी झाली तर मोठा अपघात होईल. त्यामध्ये वाहनाची हानी, जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा – मुंबईसह १४ महापालिकांची आरक्षण सोडत ३१ मे रोजी, निवडणूक आयोगाचे आणखी एक पाऊल

तसेच, पालिका आयुक्त यांनी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, रस्ते कामे पूर्ण करण्याचे गटारांवरील झाकणे लावणे आदी कामे करायला सांगितले असूनही त्याकडे पालिका विभाग कार्यालयाकडून दुर्लक्ष होत असल्याचे पादचारी, स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सदर गटारावरील तुटलेले झाकण बदलून वाहन धारकांना, प्रवासी, पादचारी यांना दिलासा देण्यात यावा, असे पादचारी, प्रवासी यांचे म्हणणे आहे.

संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

रस्त्यावरील गटारे साफ करणे, गटारांवरील तुटलेली झाकणे तात्काळ बदलणे ही कामे पालिकेच्या स्थानिक विभाग कार्यालयाची जबाबदारीच आहे. मात्र गोळीबार रोडवरील बमणजी वाडी येथे गटारावरील झाकण तुटले असून ८ – १० दिवस उलटले तरी संबंधित पालिका अधिकारी , सहाय्यक आयुक्त, अभियंते यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने जर उद्या त्या ठिकाणी झाकण न बदलल्याने काही वाहन अपघात, पादचाऱ्याला अपघात झाल्यास त्यामध्ये एखाद्या व्यक्तिचा जीव गेल्यास अथवा ती व्यक्ती कायमस्वरूपी दिव्यांग झाल्यास त्यास या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करणारा अधिकारी, कर्मचारी हे जबाबदार असतील.


हेही वाचा – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद पाकिस्तानातच, भाच्याने ईडीसमोर दिली कबुली