घरCORONA UPDATEकोरोना टाळण्यासाठी नामी शक्कल; पायाने बटन दाबा आणि लिफ्ट चालवा

कोरोना टाळण्यासाठी नामी शक्कल; पायाने बटन दाबा आणि लिफ्ट चालवा

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्पर्श न करता हात सॅनिटाईज करण्याची संकल्पना महापालिकेने राबवून तशाप्रकारची सामुग्री नगरसेवकांमार्फत जनतेला उपलब्ध करून दिली आहे. आता त्याच महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेत लिफ्टही हाताने स्पर्श न करता चालवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लिफ्टमध्ये कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेता महापालिकेच्या जी-दक्षिण आणि एम-पश्चिम विभाग कार्यालयांमधील लिफ्टमध्ये प्रायोगिक तत्वावर स्पर्श न करता पायाने बटन दाबून चालवण्याची व्यवस्था केली आहे.

कोरोनाचा संसर्ग जास्तीत जास्त लिफ्टमधून अधिक होवू शकतो. त्यामुळे लिफ्टमधून जाताना कशाप्रकारे काळजी घेतली जावी, याबाबत जनजागृती केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या जी-दक्षिण विभाग कार्यालयांमध्ये सर्व प्रथम लिफ्टमध्ये स्पर्श न करता ये-जा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर चेंबूर एम-पश्चिम विभाग कार्यालयातील दोन लिफ्टमध्येही अशाच प्रकारे व्यवस्था करून दिली आहे. महापालिकेने ओमटेक कंपनीच्या माध्यमातून ही संकल्पना राबवण्यात आली आहे. या संकल्पनेनुसार स्पर्श न करता पायाने बटन दाबून लिफ्टमध्ये प्रवेश करणे आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्या मजल्यावर जायचे आहे, त्या मजल्याच्या क्रमांकावर पायाने दाब देत बटन दाबता येते. ज्यामुळे हाताने स्पर्श न करता कर्मचाऱ्यांना लिफ्टमधून प्रवास करता येत आहे. त्यामुळे मुंबईतील ही संकल्पन संपूर्ण मुंबई महापालिकेच्या इमारतींमध्ये राबवण्याचा विचार केला जात आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या जी-दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी पुढाकार घेत येथील कार्यालय इमारतीतील लिफ्टमध्ये अशाप्रकारची संकल्पना राबवली आहे. त्यानंतर एम-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण आणि सहायक अभियंता (देखभाल) डि.बी.पाटील यांनी या कार्यालय इमारतींमधील दोन लिफ्टमध्ये ही संकल्पना राबवली आह. सहायक अभियंता पाटील यांच्या म्हणण्यानुसार ओमटेक कंपनीने अशाप्रकारच्या संकल्पना आमच्यासमोर मांडल्या होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने ही बाब आवश्यक असल्याचे ही संकल्पना याठिकाणी राबवली आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून या नवीन संकल्पनेनुसार लिफ्टमधून कर्मचाऱ्यांना तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारे हाताने स्पर्श न करता पायाने बटन दाबवून कुठल्या मजल्यावर जायचे आहे हे निवडायचे आहे,असे त्यांनी सांगितले.

bmc unique lift service1

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -