घरमुंबईमहिलांसाठी मोफत 'पॅरालिगल अभ्यासक्रम'

महिलांसाठी मोफत ‘पॅरालिगल अभ्यासक्रम’

Subscribe

महापालिका क्षेत्रातील गरजू महिलांना कायदेविषयक प्राथमिक सहाय्य स्वयंसेवी पद्धतीने मिळावे, या उद्देशाने महापालिकेच्या सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्रामध्ये ४ दिवसीय पॅरालिगल अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.

महापालिका क्षेत्रातील गरजू महिलांना कायदेविषयक प्राथमिक सहाय्य स्वयंसेवी पद्धतीने मिळावे, या उद्देशाने महापालिकेच्या सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्रामध्ये ४ दिवसीय पॅरालिगल अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमात महिलांविषयीच्या कायद्यांची आणि नियमांची प्राथमिक माहिती देण्यासोबतच घरगुती हिंसाचार, पोलीस कार्यपद्धती इत्यादींची माहिती दिली जाणार आहे. या अभ्यासक्रमाला किमान नववी पर्यंत शिक्षण झालेल्या इच्छुक महिला नाव नोंदवू शकतात. या अभ्यासक्रमाची पहिली बॅच १३ जुलै २०१८ पासून सुरू होणार असून प्रत्येक गटात २५ महिलांना प्रवेश दिला जाणार आहे. या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी ५ जुलै २०१८ पूर्वी नोंदवणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी या दूरध्वनी क्रमाकांवर संपर्क साधावा, असं आवाहन केंद्राच्या सचिव डॉ. कामाक्षी भाटे यांनी केले आहे .

नाव नोंदणीची अंतिम तारीख ५ जुलै

महापालिकेच्या सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र या ठिकाणी जिल्हा विधी प्राधीकरणाच्या समन्वयाने आणि स्नेहा संस्थेच्या सहकार्याने गरजू महिलांसाठी मोफत विधी सहाय्य केंद्राचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आहे. या अंतर्गत आता महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शुक्रवारी दुपारी २ ते ५ या वेळेत गरजू महिलांसाठी मोफत कायदेशीर सहाय्य करण्यात येणार आहे.

” महापालिकेच्या क्षेत्रातील महिलांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या या केंद्रात सध्या कौटुंबिक समुपदेशन, मार्गदर्शन शिबीरे, विविध विषयावरील प्रशिक्षणे आयोजित केली जात असतात. तसंत विषयानुरूप सुसज्ज ग्रंथालय देखील या ठिकाणी आहे.  ”

डॉ. कामाक्षी भाटे, सचिव, सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -