आकस्मिक खर्चातून महापालिका उचलणारा राजस्थान शासनाचा भार

वन्य जीव संरक्षण तसेच पर्यावरण संवर्धन याचे महत्व अधोरेखित करणारे एक भव्य दालन राजस्थानमधील जयपूर येथे भरवण्यात येणार असून या प्रदर्शनातील मुख्य प्रायोजकत्व मुंबई महापालिका स्वीकारणार आहे.

negative effect on income tax of mumbai municipal corporation because of coronavirus
करोनामुळे मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कराच्या वसुलीवर परिणाम झाला आहे. एकूण मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य ५ हजार ४०० कोटी रुपये आहे. मात्र, दहा दिवस शिल्लक असून अजूनही ४ हजार कोटींचा पल्ला लांब आहे.

वन्य जीव संरक्षण तसेच पर्यावरण संवर्धन याचे महत्व अधोरेखित करणारे एक भव्य दालन राजस्थानमधील जयपूर येथे भरवण्यात येणार असून या प्रदर्शनातील मुख्य प्रायोजकत्व मुंबई महापालिका स्वीकारणार आहे. १९ ते २६ मार्च या कालावधीत होणार्‍या प्रदर्शनावर तब्बल साडेचार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. त्यामुळे एकाबाजुला महापालिका आर्थिक संकटात सापडलेली असताना, दुसरीकडे महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी आकस्मिक निधीतून परस्पर पैसे वळून तिजोरी खाली करायला निघाले आहेत.

महापालिकेच्यावतीने सुमारे अडीच कोटींचा होणार

जागतिक दर्जाचे संमेलन आणि प्रदर्शन येत्या १९ ते २६मार्च या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. वाईल्डरनेस फाऊंडेशन ग्लोबल या जागतिक संस्थेच्यावतीने आयोजित होत असलेल्या या कार्यक्रमाला राजस्थान राज्य शासन हे सह प्रायोजक आहे. तर या प्रदर्शनासाठी मुंबई महापालिका मुख्य प्रायोजक आहे. हे अकरावे वल्ड वाईल्डनेस काँग्रेस प्रदर्शन वन्यजीव संरक्षक या विषयावर आधारीत आहे. या प्रदर्शनाला महापालिकेच्यावतीने सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी आयुक्तांनी आपल्या अधिकारात मंजूर करुन दिला आहे. मात्र, प्रत्यक्षात अडीच कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीला आणला आहे. केवळ मुख्य प्रायोजकत्व घेण्यासाठी हा कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचे बोलले जात आहे.

वल्ड वाईल्ड काँग्रेस प्रदर्शनात महापालिका मुख्य प्रायोजक

भारतातून आणि विदेशातून येणारे अभ्यागत, तज्ज्ञ यांना माहिती देण्यासाठी भव्य दालन उभारण्यात येणार आहे. महापालिकेने हाती घेतलेल्या वीरमाता जिजाबाइ भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील आधुनिकीकरण प्रकल्पांतर्गत चौथ्या टप्प्यांमध्ये इंटरप्रिटेशन सेंटर इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर वन्यजीव संरक्षण, पर्यावरण या बाबींचे अधोरेखित करणारे हे भव्य दालन असणार आहे. त्यामध्ये विविध माध्यमांद्वारे अद्ययावत माहिती प्रदर्शित करून पर्यटकांच्या मनात आवड तसेच आपुलकी निर्माण करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन दालन कायमस्वरुपी बनवण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रदर्शित करण्यात येणार्‍या बाबी या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे.

या प्रदर्शनासाठी २० अधिकारी, कर्मचारी यांचा प्रवास

मुंबई महापालिका मुख्य प्रायोजक असल्याने त्यांना ५ हजार चौरस फुटाचा कक्ष आरक्षित करण्यात येणार आहे. तर ही जागा आरक्षित करण्यासाठी दीड कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे दीड कोटींच्या खर्चाची रक्कम राजस्थान सरकारला देण्यात येत आहे. याशिवाय जयपूर प्रदर्शनाचा खर्च आणि प्रदर्शनानंतर राणीबागेत भव्य दालन उभारण्यासाठी ५ कोटींचा खर्च केला जाणार आहे. या प्रदर्शनासाठी २० अधिकारी, कर्मचारी यांचा प्रवास आणि भोजनासाठी ६५ लाखांचा खर्च, अशाप्रकारे २ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च आकस्मिक निधीतून उपलब्ध करून दिला जाणार आहे.


हेही वाचा – चॅनेलचा कमाल दर १२ रूपयांनी घटणार