घरCORONA UPDATEBooster Dose Guidelines : बुस्टर डोस घ्यायचाय! अशी करा नोंदणी, BMC ची...

Booster Dose Guidelines : बुस्टर डोस घ्यायचाय! अशी करा नोंदणी, BMC ची नियमावली जारी

Subscribe

मुंबई महानगरपालिकेने बूस्टर डोस देण्यासंदर्भात एक नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे येत्या 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, कोव्हिडमध्ये आघाडीवर काम करणारे फ्रंटलाईन कर्मचारी आणि 60 वर्ष व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांना पालिकेच्या नियमानुसार बूस्टर डोस मिळणार आहे.

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने मुंबई शहराची चिंता अधिक वाढवली आहे. गेल्या सात दिवसांत मुंबईत रुग्णसंख्या संख्या झपाट्याने वाढत असून दैनंदिन रुग्णांची संख्या २० हजारांच्या पार गेली आहे. त्यामुळे ३ जानेवारीपासून देशासह मुंबईतही लहान मुलांच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. मुंबई महानगरापालिकेने मुलांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवली आहे. तर 10 जानेवारी 2022 पासून हेल्थकेअर, फ्रंटलाइन वर्कर्स आणि हृदयविकारासारख्या काही गंभीर आजारांनी ग्रस्त 60 वर्षांवरील लोकांना डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस दिला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केली होती. त्यानुसार आता देशात नागरिकांना बुस्टर डोस देण्याची सुविधाही सुरु केली जाईल. याचपार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने एक नवी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीत पात्र नागरिकांना कोविन पोर्टलवरून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशी आहे मुंबई महापालिकेची नवी नियमावली

मुंबई महानगरपालिकेने बूस्टर डोस देण्यासंदर्भात एक नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे येत्या 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, कोव्हिडमध्ये आघाडीवर काम करणारे फ्रंटलाईन कर्मचारी आणि 60 वर्ष व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांना पालिकेच्या नियमानुसार बूस्टर डोस मिळणार आहे. ज्यात दुसरा डोस घेतल्याच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेला व्यक्तीच तिसरा अर्थात बुस्टर डोस घेण्यास पात्र असेल. जर वरील कोणत्याही नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची असल्यास केंद्र सरकारने घोषित केलेल्या किंमतीत लस घ्यावी लागेल. आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्धे ज्यांचे वय 60 पेक्षा कमी आहे आणि ज्यांची कोविन ॲपवर नागरिक अशी वर्गवारी झाली आहे अशा लाभार्थ्यांना लसीकरण फक्त सरकारी लसीकरण केंद्रात ऑनसाइट पद्धतीने उपलब्ध असेल. त्याकरिता नागरिकांनी नोकरीच्या ठिकाणाचे प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र सादर करणं बंधनकारक असणार आहे.

- Advertisement -

अशी करा नोंदणी

पात्र नागरिकांना लसीचा बुस्टर डोस हा ऑफलाईन आणि ऑफलाईन नोंदणी पद्धतीने घेण्याची सुविधा पालिकेने उपलब्ध करुन दिली आहे. दरम्यान ऑनलाईन पद्धतीने बुस्टर डोस घेऊ इच्छिणाऱ्या पात्र नागरिकांना यासाठी कोविन पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करणं आवश्यक असेल. तर बुस्टर डोस देताना लसीकरण केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र जमा किंवा दाखवायची आवश्यकता नाही, फक्त अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा, असं मुंबई महापालिकेच्यावतीनं कळवण्यात आलं आहे. सर्व नागरिकांना शासकीय केंद्रावर लसीकरण विनामूल्य होणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -