घरताज्या घडामोडीरेड, ऑरेंज अलर्टवेळी समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी; महापालिकेच्या मुंबईकरांना सूचना

रेड, ऑरेंज अलर्टवेळी समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी; महापालिकेच्या मुंबईकरांना सूचना

Subscribe

मुसळधार पावसात मुंबईची तुंबई होते. तसेच, जास्तीचा पाऊस झाल्यास हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. त्यानुसार मागील काही दिवसांपासून मुंबईच पावसाची संततधार कायम आहे.

मुसळधार पावसात (Heavy Rainfall) मुंबईची तुंबई होते. तसेच, जास्तीचा पाऊस झाल्यास हवामान विभागाकडून (IMD) सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. त्यानुसार मागील काही दिवसांपासून मुंबईच पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे हवामाना विभागानेही अलर्ट जारी केले आहेत. अशाताच या अलर्टच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सूचना जारी केल्या आहेत. (bmc issued notification on the day of red alert and orange alert)

महापालिकेच्या सूचनांनुसार, रेड अलर्ट (Red alert) आणि ऑरेंज अलर्टच्या (Orange alert) दिवशी केवळ सकाळी ६ ते १० या वेळेतच समुद्रकिनारी जाण्यास परवानगी असेल. त्यानंतर बीचेसवर कुणीही फिरकु नये अशी सूचना महापालिका प्रशासनाने दिली आहे.

- Advertisement -

यंदाच्या मान्सूनमध्ये (Monsoon) समुद्रात बुडून १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मुंबईत रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी वारंवार विनंती आणि आवाहन करुनही मुंबईकर आणि पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यास जात आहेत. त्यामुळे रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना कोणीही समुद्रकिनारी, चौपाट्यांवर फिरण्यास किंवा पोहण्यास जायला प्रशासनाकडून प्रतिबंध करण्यात आला आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला पुढील ५ दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत ७ आणि ८ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा वर्तवण्यात आला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

- Advertisement -

कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात १५ एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – शिवसेनेत उठाव करणं गरजेचं होतं, आमदार सदा सरवणकरांची खंत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -