घरमुंबईparking करा घर बसल्या; मुंबईकरांसाठी महापालिकेचे नवीन app

parking करा घर बसल्या; मुंबईकरांसाठी महापालिकेचे नवीन app

Subscribe

 

मुंबई: मुंबईत दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. दादर, सीएसएमटी, फोर्ट, मंत्रालय, न्यायालय आदी महत्वाच्या ठिकाणी वाहन पार्किंग करणे मुश्किल झाले आहे. वाहन पार्किंगची सुविधा कुठे, किती प्रमाणात आहे, जागा खाली आहे का, याबाबतची माहिती घर व कामाच्या ठिकाणी बसल्या जागेवर मोबाईलद्वारे एका app वर क्लिक करताच क्षणात ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. एवढेच नव्हे तर पार्किंगचे पेमेंटही ऑनलाईनच करण्याची सुविधा app वर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना शहरात कोणत्याही ठिकाणी वाहन पार्किंग सुविधेची माहिती क्षणात उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

दादर, क्रॉफर्ड मार्केट, जुहू, गिरगाव चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया, मुंबई महापालिका, पोलीस आयुक्तालय, मंत्रालय आदी ठिकाणी भेटी देणाऱ्या, फिरायला जाणाऱ्या वाहन चालकांना, मालकांना आपले वाहन पार्किंग करण्यास जागा नसते अथवा जागेची कमतरता भासत असते. वाहन दूर अंतरावर पार्किंग करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवते. अनेकदा चुकीच्या ठिकाणी वाहन पार्किंग केल्याने वाहतूक पोलीस टो व्हॅन द्वारे वाहन उचलून जमा करते. तर वाहतूक पोलिसांनी धाड पडल्यास सदर वाहन चालक, मालक यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते.

महापालिकेची वाहन पार्किंग ठिकाण, एमएमआरडीए, मुंबई पोर्ट ट्रस्ट, खाजगी गृहनिर्माण सोसायटी, सरकारी व निमसरकारी संस्थेकडे असलेल्या जागेत विशेष वेळेत पार्किंगसाठी जागा उपलब्ध करण्यात येणार आहे. वाहन चालक, मालक यांना, आपले वाहन कुठे पार्क करायचे, वाहनांसाठी जागा उपलब्ध आहे, किती प्रमाणात जागा आहे, आपले वाहन पार्किंग करण्याची व्यवस्था होईल की नाही, जागा असल्यास तात्काळ वाहन पार्किंग बुकिंग करणे याबाबतची माहिती वाहन चालक, मालक यांना घरी, कार्यालयात मोबाईलवर एका app वर क्लिक करून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.
यासाठी app विकसीत केला जात असून एकाच साॅफ्टवेअर इंटरफेस अंतर्गत आणले जाणार आहे.‌ मुंबईतील पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी मोबाईल app महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे वाहन चालक, मालक यांना आता मुंबईत कुठेही, कधीही वाहन पार्किंग करण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -