घरमुंबईमुंबई महापालिका मुख्यालयाला नवी झळाळी, G-20 परिषदेसाठी इमारतीची रंगरंगोटी

मुंबई महापालिका मुख्यालयाला नवी झळाळी, G-20 परिषदेसाठी इमारतीची रंगरंगोटी

Subscribe

 

मुंबई: जी-२०परिषदेच्या आपत्ती सौम्यीकरण कार्यगटाची दुसरी बैठक मुंबईत २३ ते २५ मे या कालावधीत होणार आहे.आपत्ती सौम्यीकरण कार्यगटाचे शिष्टमंडळ २३ मे रोजी मुंबई महापालिका मुख्यालयाला देणार भेट देणार आहे. तसेच, आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या अभ्यास दौऱ्यासह ‘हेरिटेज वॉक’ करणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणांस्तव महापालिका मुख्यालयात २३ मे रोजी सकाळी ११ नंतर अभ्यागतांसह पत्रकारांना प्रवेश बंदी असणार आहे. तसेच, दुपारी २ नंतर पालिका कर्मचाऱयांना दुपारी २ नंतर अर्धा दिवस सुट्टी देण्यात येणार आहे. त्याची जोरदार पूर्वतयारी सुरू असून पालिका मुख्यालयाचा व परिसराचा चेहरामोहरा बदलण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या आवारातील रस्त्यांचे युद्धपातळीवर व घाईघाईने डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे काम चांगले झालेले दिसून येत नाही. तसेच, पालिका मुख्यालयात व आवारात काही रंगरंगोटी करण्यात आली आहे. विशेषतः पालिकेच्या हेरिटेज इमारतीमधील आजूबाजूचे जुने लाकडी व लोखंडी भंगार सामान हटविण्यात आले आहे. ब्रिटिश कालीन पंपिग कक्षाची इतरत्र असलेली जुनी कौले बदलण्यात आली आहेत. तसेच, शौचालयांची तातडीने दुरुस्ती करण्यात आली आहे. हेरिटेज इमारतीमधील परिसर, तळमजला, पहिला व दुसऱ्या मजल्यावर सुशोभीकरण अंतर्गत आकर्षक कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत.

पालिकेसमोरील रस्ता चकाचक, मेट्रोची कामे बंद
या जी – २० परिषदेसाठी पालिकेने मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. पालिका मुख्यालयासमोरील रस्ता तातडीने दुरुस्त करून आजूबाजूचे सामान हटवून रस्ता चकचक करण्यात आला आहे. तसेच, पालिका मुख्यालयासमोरच गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले मेट्रो रेल्वेचे काम कदाचित जी – २० परिषदेचा दौरा पार पडेपर्यंत थांबविण्यात आल्याचे दिसून येते.

- Advertisement -

सजावटीसाठी १०० किलो पेक्षाही जास्त फुलांचा ढीग
आपत्ती सौम्यीकरण कार्यगटाचे शिष्टमंडळ २३ मे रोजी मुंबई महापालिका मुख्यालयाला देणार भेट देणार असल्याने पालिकेतील संबंधित खात्याचे अधिकारी व कर्मचारी हे लगबगीने व जोरदार तयारी करीत आहेत. उद्यान खात्यामार्फत पालिका मुख्यालयात ठिकठिकाणी आकर्षक कुंड्या लावण्यात आल्या आहेत. तसेच, ठिकठिकाणी जी- २० चा आकर्षक फलक आकर्षक फुलांनी सजविण्यात आला आहे. त्यासाठी आकर्षक व फॅन्सी फुले, लाल व पिवळ्या रंगाची १०० किलो पेक्षाही जास्त वजनाची झेंडूच्या आकर्षक फुलांचा ढिगारा ठेवण्यात आला आहे. ‘जी- २० परिषदेचा लोगो फुलांनी सजविण्यात आलेला आहे.

पक्ष कार्यालयांच्या दरवाजाला सील कायम मात्र नोटीस हटवली
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेत गेल्या वर्षी उभी फूट पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत सत्ता स्थापन केली. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकटी पडली. ठाकरे व शिंदे गटातील वाद पाहता पालिका आयुक्त यांनी, शिवसेना पक्ष कार्यालय व इतर पक्षाच्या कार्यालयांच्या दरवाजांना सील ठोकले व दरवाजाला माहितीसाठी कागदी नोटीस लावल्या होत्या. मात्र आता जी-२० परिषदेच्या बैठकीसाठी देश – विदेशातील शिष्टमंडळ भेट देणार असल्याने पालिकेने सदर टाळ्याचे सील कायम ठेवले व कागदी नोटिसा हटविण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -