घरCORONA UPDATEमुंबईत शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करणार- महापौर

मुंबईत शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करणार- महापौर

Subscribe

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्य़ाने राज्य सरकारने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून राज्यात तब्बल दीड वर्षानंततर शाळांची घंटा वाजणार आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी महापौरांनी मुंबईत शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य असल्याचे जाहीर केले. त्यामुळे मुंबईत ४ ऑक्टोंबरला शाळा सुरु करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शिक्षकांचे लसीकरण पूर्ण होणार आहे.

यावेळी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की,  युवा, युवती दिनानिमित्त लसीकरणाची विशेष मोहिम राबवली जाते, त्याचप्रमाणे शिक्षण दिनानिमित्त शिक्षण आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एकाच वेळी पहिला असेल तर पहिला डोस आणि पहिला डोस झाला असेल तर ८४ दिवसांनी दुसरा डोस देण्याचे आदेश आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. यासाठी पालिका आढावा घेईल.

- Advertisement -

मुंबईतील शाळा सुरु करण्यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय होईल 

राज्य सरकारची आरोग्यविषयक टास्क फोर्स टीम, आयसीएमआर, WHO सह मिळून मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ निर्णय घेत आहे. त्या निर्णयाला अनुसरुण महानगरपालिका काम सुरु करणार आहे. सोमवार मंगळवार पर्यंत मुंबईतील शाळा सुरु करण्याच्या निर्णयासंदर्भातील विस्तृत माहिती दिली जाईल. हा आढावा घेताना गणपती नंतर झालेल्या चाचण्यानंतर काय रिझल्ट आला तेही पाहिलं जाईल, अशी माहिती महापौरांनी घेतली.

सर्व शिक्षक लसवंत केले जाईल

मुंबईमध्ये ८ ते १० आणि त्या पुढचे म्हणजे महाविद्यालय सुरु करणार आहोत. वरळी सिफेस किंवा महालक्ष्मीच्या इथे जिथे लोकलने प्रवास करत येणं सोप्प जाईल अशा ठिकाणी शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहिम घेणार आहोत. या एक दिवशीय लसीकरण मोहिमेत जवळपास २ ते २.५० हजार लसी देऊन होतात. त्यामुळे मुंबईतील प्रत्येक विभागात अशा लसीकरण मोहिम सुरु करुन सर्व शिक्षक लसवंत केले जाईल. मुंबईत जवळपास ७० टक्के शिक्षकांचे लसीकरण आत्तापर्यंत पूर्ण झाले आहे. असेही महापौरांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

मुंबई कोरोनाच्या काळात डेंजर झोनमध्ये होती तेव्हा शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेतला, मात्र आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाली तसेच तिसऱ्या लाटेची भीती बऱ्या अंती कमी झाली आहे. तसेच बाहेरून येणाऱ्या नागरिकांची चाचणी केली जात आहे. मात्र तिसऱ्या लाटेची भीती लक्षात घेता जास्त जास्त लसीकरण करु आणि केंद्राकडून जे २५ टक्के लसी सेल होतात तसेच इतर रुग्णालयांमधूनही लस उपलब्ध होत आहे. असेही महापौरांनी सांगितले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -