घरमुंबईBMC News : मोकळ्या भूखंडाबाबतचे वादग्रस्त धोरण अंतिम होण्यापूर्वीच रद्द!

BMC News : मोकळ्या भूखंडाबाबतचे वादग्रस्त धोरण अंतिम होण्यापूर्वीच रद्द!

Subscribe

हे धोरण आम्ही आक्षेप घेतल्यानेच रद्द करण्यात आले आहे, असा दावा काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून केला आहे. तर भाजप पक्षातर्फे कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काँग्रेसचा दावा खोडून काढत हे धोरणाबाबत आपण वेळोवेळी आवाज उठवला, आक्षेप घेतला त्यामुळेच धोरण रद्द करण्यात आल्याचा दावा केला आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेचे मोकळे भूखंड, मैदाने दत्तक तत्वावर खासगी संस्थांना काही कालावधीसाठी देखभाल, सांभाळ करण्यासाठी देण्याबाबत मुंबई महापालिकेने तयार केलेल्या धोरणाला लोकप्रतिनिधी, खासगी संस्था, सामाजिक संस्था व सामान्य नागरिकांकडून तीव्र विरोध झाल्याने अखेर पालिकेने सदर धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. (BMC News Controversial policy regarding open plots canceled before finalization)

हे धोरण आम्ही आक्षेप घेतल्यानेच रद्द करण्यात आले आहे, असा दावा काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून केला आहे. तर भाजप पक्षातर्फे कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काँग्रेसचा दावा खोडून काढत हे धोरणाबाबत आपण वेळोवेळी आवाज उठवला, आक्षेप घेतला त्यामुळेच धोरण रद्द करण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मोकळ्या भूखंडाबाबत धोरण बनवितानाच विरोधाला सुरुवात झाली होती. आता वादग्रस्त धोरण रद्द झाल्यावर त्याच्या श्रेयावरूनही भाजप आणि काँग्रेस यांच्यात वाद उफाळून आला आहे.

- Advertisement -

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी, पालिकेने मोकळे भूखंड, मैदाने दत्तक तत्वावर देण्याबाबतचे धोरण वादग्रस्त ठरल्याने ते रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे श्रेय काँगेस पक्षाला दिले आहे. काँग्रेस पक्षातर्फे सदर वादग्रस्त धोरणाला विरोध केल्यानेच पालिकेने सदर धोरण रद्द केले, असा दावा वर्षा गायकवाड यांनी ट्वीटद्वारे केला. त्याची गंभीर दखल राज्याचे कॅबिनेट मंत्री व मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेत धोरणात काही चुकीच्या बाबींवर बोट ठेवत आपण त्यास आक्षेप घेतला आणि जनमत जाणून घेतले आणि काही सुधारण करण्यास सांगितले होते. त्यामुळेच अखेर पालिकेने सदर वादग्रस्त ठरलेले धोरण रद्द केले, असा दावा लोढा यांनी केला आहे.

हेही वाचा : Chitra Wagh On Thackeray: वांद्रे ते शेतीच्या बांधापर्यंत जायचेही…; चित्रा वाघ यांचा ठाकरेंना टोला

- Advertisement -

वर्षाताई गायकवाड ही श्रेयवादाची लढाई नाही. आम्ही ओपन स्पेस पॉलिसीबाबत महापालिका आयुक्तांना डिसेंबर 2023 मध्ये लिहिलेले हे पत्र तुम्ही जरूर वाचावे. त्यात नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्याचे आदेश यापूर्वीच दिले असताना, हे काँग्रेसचे श्रेय कसे? असा सवाल करत कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काँग्रेस नेत्या आ. वर्षा गायकवाड यांनी ओपन स्पेस पॉलिसीबाबत केलेल्या ट्वीटला दिले. मुंबईकरांच्या प्रश्नांना प्राधान्य देताना, त्यांच्या सेवेसाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे हे जनतेचे श्रेय आहे, काँग्रेसचे नाही! असेही कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा : Rahul Gandhi : भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ‘इंडिया’ला धक्के; यात्रा मुंबईत येण्यापूर्वीच काँग्रेसला गळती

पालिकेवर अभिनंदनाचा वर्षावर

भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी खुल्या जागांच्या मसुदा धोरणावर नागरिकांच्या आक्षेपांची दखल घेतल्याबद्दल आणि ते मसुदा धोरण रद्द केल्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन केले आहे. तसेच, खुल्या जागेच्या धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि सल्ला मसलतीची आवश्यकता असल्याने, नागरिक, एएलएम आणि रहिवासी संघटनांना देखील यामध्ये सहभागी करून घ्यावे. बीएमसीमध्ये नगरसेवक नसताना महापालिकेने कोणतेही नवीन ओपन स्पेस धोरण प्रस्तावित करू नये अशी मागणी नार्वेकर यांनी केली आणि प्रशासनातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींचे महत्व अधोरेखित केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -