घरताज्या घडामोडीLata Mangeshkar Funeral : ...म्हणून लता दीदींचे अंत्यसंस्कार शिवाजी पार्कात करण्याचा सरकारने...

Lata Mangeshkar Funeral : …म्हणून लता दीदींचे अंत्यसंस्कार शिवाजी पार्कात करण्याचा सरकारने घेतला निर्णय

Subscribe

अंत्यदर्शन आणि अंत्यविधी या प्रयोजनाकरिता ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाचा अंदाजे २००० चौ.फुटाची जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे ९३व्या वर्षी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान येथे संध्याकाळी ६:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. खरंतर शिवाजी पार्क येथे अशा प्रकारे कोणताही कार्यक्रम आयोजित केला जात नाही मात्र लता दीदींच्या अंत्यसंस्कार आणि अंत्यदर्शनाच्या वेळी लाखोंच्या संख्येने जमसमुदाय जमण्याची शक्यता आहे. देशातील अनेक मान्यवर लता दीदींच्या अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कारासाठी मुंबईत दाखल होणार आहेत. इतका मोठा जनसुदाय सामावून घेण्याची क्षमता दादर येथील कोणत्याही स्मशानभूमीमध्ये नाही. आणि म्हणूनच लता दीदींचे पार्थिव शिवाजी पार्कमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुंबई पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चलह यांनी परिपत्रकारद्वारे ही माहिती दिली आहे.

लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शन व अंत्यविधीच्या संबंधात उद्भवलेल्या उपरोक्त विशेष परिस्थितीचा विचार करून व राज्य शासनाने दिलेल्या मान्यतेच्या अधीन राहून मुंबई पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिका कायदा १८८८च्या कलम ४४० (२) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यास परवानगी दिली आहे. अंत्यदर्शन आणि अंत्यविधी या प्रयोजनाकरिता ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाचा अंदाजे २००० चौ.फुटाची जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही परवानगी उपरोक्त विशेष परिस्थितीतील अपवादात्मक बाब म्हणून देण्यात आली आहे. तर सदर परवानगी ही पूर्वोदाहरण म्हणून मानण्यात येणार नाही. त्याचप्रमाणे या जागेचा वापर इतर कोणत्याही बाबीसाठी करता येणार नाही, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

लता दीदींचे पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालायातून दक्षिण मुंबईच्या पेड रोड येथील त्यांच्या प्रभू कुंज या राहत्या घरी ठावण्यात आले होते. त्यानंतर आत लता दीदींची अंत्ययात्रा शिवाजी पार्कच्या दिशेना रवाना झाली आहे. लता दीदींच्या अंत्ययात्रेत लाखोंच्या समुदायाने लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी केली आहे. तसेच लता दीदींच्या अंत्ययात्रेसाठी मोठा पोलीसफाटा तैनात करण्यात आला असून पोलिसांनीची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.  दीदींच्या पार्थिवाच्या पुढे आणि मागे अशा दोन्ही बाजूंना पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. लतादीदींच्या पार्थिवासोबत मंगेशकर कुटुंबीय उपस्थित आहेत. आशा भोसले, उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर आणि बैजनाथ मंगेशकर हे दीदींच्या पार्थिवासोबत उपस्थित आहेत. अंत्यदर्शनासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली असून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. तसेच लतादीदी अमर रहे अशा प्रकारच्या घोषणा लोकांकडून केल्या जात आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या निधनाने राज्यात एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -