घरताज्या घडामोडीकोस्टल रोडच्या कार्यक्रमात डावलल्याने विरोधी पक्षनेते संतप्त

कोस्टल रोडच्या कार्यक्रमात डावलल्याने विरोधी पक्षनेते संतप्त

Subscribe

'कोस्टल रोडच्या अंतर्गत खोदण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाच्या खोदकामाच्या शुभारंभाला सर्वपक्षीय गटनेते यांना डावलण्यात आले', असा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत व्यक्त करत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘देशातील पहिला कोस्टल रोड मुंबईत उभारण्यात येत आहे. या कोस्टल रोडच्या अंतर्गत खोदण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाच्या खोदकामाचा शुभारंभा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला, ही बाब चांगली आहे. मात्र, या कार्यक्रमाबाबत सर्वपक्षीय गटनेते यांना डावलण्यात आले’, असा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत व्यक्त करत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, हा कार्यक्रम फक्त आयुक्त इकबाल चहल यांच्यासाठीच होता का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर भाजपचे सदस्य मकरंद नार्वेकर यांनी, कोस्टल रोडच्या कार्यक्रमात महापौर, स्थायीं समिती अध्यक्ष हेसुद्धा दिसले नाहीत. त्यामुळे त्यांनाही डावळण्यात आले होते, असा आरोप केला.

दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, आपण वैक्तिक कारणासाठी बाहेर होतो, असे सांगितले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी, पालिका आयुक्त इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे हेच उपस्थित होते. मात्र, महापौर, सर्वपक्षीय गटनेते, सभागृह नेते आदी कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत सदर विषय उपस्थित करून प्रशासनावर चांगलीच तोफ डागली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लसीने कोरोनाचा खात्मा होणार – महापौर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -