घरमुंबईकुर्ला येथील 'त्या' धोकादायक तीन इमारती पालिका पाडणार

कुर्ला येथील ‘त्या’ धोकादायक तीन इमारती पालिका पाडणार

Subscribe

२०१४ व २०१५ मध्ये पालिकेने सदर धोकादायक इमारती पाडण्याबाबत सोसायटीला नोटीसा बजावल्या होत्या

कुर्ला , नाईकनगर सोसायटी येथील जिल्हाधिकारी यांच्या जागेवरील धोकादायक ‘ डी’ विंग इमारत सोमवारी रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत १९ जणांचा बळी गेला तर १४ जण जखमी झाले. त्यामुळे क्तअ पालिकेने सदर ठिकाणी अस्तित्वात असलेल्या ‘ए’, ‘बी’, ‘सी’ या तीन धोकादायक विंग पालिकेकडून लवकरच पाडण्यात येणार आहेत. दरम्यान, ‘डी’ विंगचा काही भाग जो धोकादायक आहे त्याचे पाडकाम पालिकेकडून पूर्ण करण्यात आले आहे. तसेच, दुर्घटनाग्रस्त इमारतीचा ढिगारा उचलण्याचे काम बुधवारी करण्यात आले.

यासंदर्भातील माहिती कुर्ला ( एल) प्रभागाचे सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे यांनी दिली आहे. वास्तविक, नाईक नगर सोसायटीमधील चार ते पाच मजली ४ इमारती या धोकादायक असल्याचे पालिकेने यापूर्वीच जाहीर करून २०१३ मध्ये नोटीस बजावली होती. मात्र त्यानंतरही त्याकडे दूर्लक्ष करण्यात आले. इमारतीची वेळीच दुरुस्ती कामे न केल्याने अखेर सदर इमारत दुर्घटना घडल्याचे मत पालिकेकडून व्यक्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

तसेच, २०१४ व २०१५ मध्ये पालिकेने सदर धोकादायक इमारती पाडण्याबाबत सोसायटीला नोटीसा बजावल्या होत्या. तर २०१६ मध्ये अखेर पालिकेने इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली होती. मात्र तरीही पालिकेच्या नोटिशीची दखल सदर इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी घेतली नाही. तसेच, त्यांनी सदर धोकादायक इमारतीमधील खोल्या भाड्याने दिल्या. परिणामी सदर इमारत दुर्घटना घडून त्यामध्ये मोठी जीवित हानी झाली.

आता पालिकेने या सर्व घटनाप्रकाराची गंभीर दखल घेऊन सदर ठिकाणी असलेल्या तीन धोकादायक विंग पाडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पालिकेने दुर्घटनाग्रस्त व शेजारील इमारतीमधील नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था नजीकच्या पालिका शाळेत केली आहे. मात्र त्या ठिकाणी सदर नागरिक अद्याप राहायला गेले नसल्याचे समजते.


कुर्ला इमारती दुघर्टनेतील मृतांचा आकडा 19 वर, राज्य सरकारकडून मृतांना 5 लाखांची आर्थिक मदत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -