घरताज्या घडामोडी५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होम द्याच; अन्यथा कारवाई होणार

५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होम द्याच; अन्यथा कारवाई होणार

Subscribe

करोना या विषाणूचा प्रसार होऊ नये, याकरता महापालिकेने ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होम द्याच असा आदेश काढला आहे.

मुंबईत करोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून पूर्वकाळजी म्हणून महापालिकेने एक निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी खासगी कंपन्यांना एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवा आणि इतर ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होमची मुभा देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कलम १८८ अंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा आदेश अत्यावश्यक सेवा असणाऱ्यांना लागू नाही, असे देखील सांगण्यात आले आहे.

तपासणीसाठी वॉर्ड ऑफिसर कंपन्यांना जाऊन भेट देणार

कार्यालयातील अर्ध्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मुभा खासगी कंपन्यांना देता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे करोनाचा प्रसार देखील होणार नाही. त्याचप्रमाणे या निर्णयाची अमलबजावणी होत आहे की नाही हे तपासणीसाठी वॉर्ड ऑफिसर कंपन्यांना जाऊन भेट देऊन पाहणी करणार आहे. तसेच या निर्णयामध्ये बँकिंग, टेलिफोन, इंटरनेट सेवा, रेल्वे वाहतूक, रुग्णलये, मेडिकल स्टोअर्स, फूड मार्केट यासारख्या अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.  – प्रवीण परदेशी; महापालिका आयुक्त

- Advertisement -

मुंबईत ६ रुग्ण आढळले

जगात धुमाकूळ घालणाऱ्या करोना व्हायरसने आता महाराष्ट्रात हात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. हा करोना व्हायरस आता मुंबईत येऊन दाखल झाला आहे. आतापर्यंत मुंबईत सहा रुग्ण आढळून आले असून राज्यातील करोना लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. त्यामुळे आता खबरदारी म्हणून महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा – रेल्वे स्थानकात जमावबंदी; गर्दी करणाऱ्यांवर ठेवणार नजर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -